घरमहाराष्ट्रनाशिककोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेचे ‘अ‍ॅप्सबॉम्ब’

कोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेचे ‘अ‍ॅप्सबॉम्ब’

Subscribe

कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी नाशिक महापालिकेने डिजिटल हत्यार उपसले असून, विविध मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे संपर्क यंत्रणा आणि माहिती पुरवण्याची व्यवस्था अधिक बळकट केली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे अ‍ॅप्लिकेशन्स नागरिकांना घरबसल्या उपलब्ध असल्याने त्याचा फायदादेखील घेतला जात आहे.

कोरोनाशी सक्षमपणे लढा देण्यासाठी नाशिक महापालिकेने डिजिटल हत्यार उपसले असून, विविध मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे संपर्क यंत्रणा आणि माहिती पुरवण्याची व्यवस्था अधिक बळकट केली आहे. आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले हे अ‍ॅप्लिकेशन्स नागरिकांना घरबसल्या उपलब्ध असल्याने त्याचा फायदादेखील घेतला जात आहे.

Nashik Bazzar :

जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू सर्वाना मिळाव्या यासाठी नाशिक महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. किराणा दुकानामध्ये होणारी गर्दी थांबावी, लोकांना घरपोच माल मिळावा यासाठी महापालिका व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीक्लचर यांच्या संयुक्त विदयामाने अल्टालिएंट इन्प्फोटेक ने ” नाशिक बाजार ” हे मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. ते सर्वासाठी मोफत उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये नाशिक मधील किराणा दुकानादारांनी व नागरिकांनी नोंदणी करुन त्यावर आपल्या मालाची मागणी नोंदविल्यावर त्या भागातील दुकानदार आपल्या ऑर्डर नोंदवून मालाची घरपोच डिलीव्हरी करतील. हे अ‍ॅप नाशिक महापालिकेच्या www.nmc.gov.in या संकेतस्थळावर Nashik Bazzar या नावाने उपलब्ध आहे. https://nashikcorporation.in/images/nashikbazzar/NashikBazzar.apk या लिंकवर क्लिक केल्यास हे अ‍ॅप विनामुल्य उपलब्ध होऊ शकेल.

- Advertisement -

महाकवच :

केंद्र सरकारचा राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राज्य शासनाची महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन व नाशिक स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाकवच’ नावाने डिजीटल व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे. नाशिक स्मार्ट सिटी, डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर, कुंभेथॉन इनोवेशन फाऊंडेशन यांचेही अ‍ॅप निर्मितीस सहकार्य लाभले आहे. या अ‍ॅपमधील प्रमुख दोन घटकांत कॉन्टॅक ट्रेसिंग आणि क्वारंटाइन ट्रॅकिंग यांचा समावेश आहे. यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचा शोध लावला जातो. अशी व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याची माहिती मिळविणे या अ‍ॅपमुळे शक्य होणार आहे. याशिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याची माहितीही महाकवचामुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचार्‍यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता महाकवचामुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्ती यांनी किमान १४ दिवस स्वतःचं विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक आहे. पण,लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच अ‍ॅप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा अ‍ॅपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. या अ‍ॅपचे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो अ‍ॅपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल. महाकवच अ‍ॅप हे केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी असून फक्त अशाच व्यक्ती हे अ‍ॅप वापरू शकतात. त्यांना ह्या अ‍ॅसाठी लिंक व कोड मनपाकडून पाठवण्यात येईल. इतर लोकाना मात्र हे अ‍ॅप वापरण्याची परवानगी नसेल.

एनएमसी कोविड १९ :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NMC COVID-19 मोबाईल अ‍ॅप्लिकेशन कार्यान्वित केलेले आहे. हेे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन पालिकेच्या http://www.nmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोरोनाविषयीची भीती दूर करण्यासाठी आणि अफवा दूर करण्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी ठरत आहे. नाशिक महापालिका, नाशिक स्मार्ट सिटी व कोडवेल टेकनॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. आजमितीला नागरिक माहिती कक्ष अथवा आपत्कालीन कक्ष येथे दूरध्वनीद्वारे माहिती पोहोचविण्याचे काम करतात. नाशिक महापालिकेतर्फे नियोजित केलेल्या विभागीय वैद्यकीय अधिकारी संबंधित नागरिकांकडे जाऊन आरोग्य तपासणी करून पुढील योग्य तो निर्णय घेतात. अशा प्रकारे परदेशातून आलेले नागरिक अथवा कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले नागरिक यांची तपासणी करून योग्य तो निर्णय घेतला जातो. याबाबतचा दैनंदिन अहवाल शासनास पाठविला जातो. ही कार्यपद्धती व नागरिकांना माहिती देण्यास सोपे जावे याकरता नाशिक महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांची किंवा कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची बाबत माहिती भरू शकतात. ही माहिती नाशिक महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर त्वरित प्राप्त होऊन ताबडतोब संबंधित नागरिकाच्या घरी पथकाची भेट दिली जाईल व आवश्यक ते कामकाज जलद गतीने होईल.

- Advertisement -

कोविड-१९ मोबाईल अ‍ॅप कशासाठी?

  • शहरातील सरकारी दवाखान्याची लिस्ट
  • शहरातील सर्व सरकारी दवाखान्याची नावे आणि संपूर्ण पत्ता तसेच नंबर आहेत.
  • थेट डॉक्टरांची संपर्क -वातावरणातील बदल किंवा इतर कारणाने सर्दी, खोकला , ताप असे कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास या अ‍ॅपद्वारे थेट त्या डॉक्टरांशी संपर्क करून योग्य उपचार किंवा सल्ला मिळवू शकता.
  • न्यूज फिडस – कोरोना बद्दल अधिकृत माहिती सरकारद्वारे थेट आपल्या मोबाईलवर उपलब्ध होईल त्यामुळे खोटया अफवांना आळा बसेल .
  • अन्न दान/देणगीदार -कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला अन्न दान करायचे असेल तर ते आपले मोबाईल नंबर येथे नोंद करू शकता.
  • दैनिक आवश्यक वस्तू, भाजीपाला आणि फळे विकणार्‍याची नावे आणि पत्ता, औषधालय दुकानांची नंबर आणि पत्ता
  • शहरातील निवारा केंद्राची माहिती या अ‍ॅपवर मिळेल
  • कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगारांसाठी उभारलेल्या निवारा शेडची माहिती

सेल्फ असेसमेंट टूल (स्व-चाचणी) :

सेल्फ असेसमेंट टूल www.covid-19.maharashtra.gov.in या संकेत स्थळावार १ एप्रिलपासून उपलब्ध आहे. वैद्यकीय सल्ला, आवश्यक ती माहिती, संपर्क क्रमांक या लिंकवर उपलब्ध आहे. विशेष बाब म्हणजे, इतर
स्व-चाचणी टूल फक्त लक्षणे दर्शवितात. तर या टूलने चाचणी केल्यावर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे ही मध्यम किंवा उच्च स्वरूपाची असतील. तर अशा व्यक्तीचे वैयक्तिक तपशील प्रशासनापर्य्ंत पोहोचतील. मग प्रशासन त्या व्यक्तिपर्यंत त्वरित पोहोचू शकणार आहे. परिणामी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होऊ शकेल. हा प्लॅटफॉर्म क्यु आर कोड रूपात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खाजगी दवाखाने येथेही उपलब्ध असणार आहे. जेणेकरुन तिथेही रुग्णांना स्व-चाचणी करता येईल. या नोंदी केल्याने प्रशासनाला सतत अद्ययावत होणारा डॅशबोर्ड पाहता येईल आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेता येतील.

सध्या हा प्लॅटफॉर्म तयार झाला असून नाशिक प्रशासनात त्याचा वापर सुरू आहे. लवकरच तो संपूर्ण महाराष्ट्रभरात लॉन्च करण्यात येईल. डॉक्टर्स, प्रशासकीय व्यवस्था, पोलीस आणि समाजातील अनेक मंडळी कोरोना विरुद्धची ही लढाई लढत आहेत. आता या व्यापक लढ्याला या नव्या प्लॅटफॉर्ममुळे एक अत्यंत वेगळा असा डिजिटल प्रयत्नही जोडला जात आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यात याची फार महत्त्वाची भूमिका असेल.
-राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका 

 

कोरोनाशी लढण्यासाठी महापालिकेचे ‘अ‍ॅप्सबॉम्ब’
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -