घरताज्या घडामोडीपालिका बस तिकीट दराचा चेंडू आरटीओच्या कोर्टात

पालिका बस तिकीट दराचा चेंडू आरटीओच्या कोर्टात

Subscribe

महापालिकेच्या बस सेवेला परिवहन सचिवांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर आता तिकीट दरपत्रक निश्चितीसाठी महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवला आहे. हे दर निश्चित झाल्यानंतर बस सेवा सुरु होण्याचा मार्ग निश्चित होईल.

महापालिकेच्या बस सेवेला परिवहन सचिवांची परवानगी प्राप्त झाल्यानंतर आता तिकीट दरपत्रक निश्चितीसाठी महानगर परिवहन महामंडळाने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवला आहे. हे दर निश्चित झाल्यानंतर बस सेवा सुरु होण्याचा मार्ग निश्चित होईल.
महापालिकेची शहर बससेवा परिवहन सचिवांच्या परवानगीमुळे लांबणीवर पडली होती. आता परवानगी मिळाली असली तरीही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अशा परिस्थितीत बस सुरु करायची की नाही या विवंचनेत प्रशासन आहे. मात्र त्यापूर्वी सेवा सुरु करण्यासाठीच्या औपचारिकता पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परिवहन महामंडळाच्या गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन बससेवेचे तिकीट दरपत्र सादर करण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या दोन किलोमीटरसाठी मोठ्यांकडून १० रूपये व हाफ तिकीटसाठी पाच रुपये, त्यानंतर प्रत्येक दोन किलोमीटरसाठी वेगवेगळ्या स्वरुपाचे तिकीट दर आकारण्याचा प्रस्ताव आहे. ही बस नाशिक शहरात तर धावणार आहेच; शिवाय त्र्यंबकेश्वर, भगूर, ओझरपर्यंत ती जाणा आहे. नाशिकपासून ५० किलोमीटर प्रवासासाठी ६५ रुपये भाडे आकारण्याचे प्रस्तावित आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या तुलनेत महापालिकेच्या बससचे तिकीट दर कमी असतील असेही यावेळी सांगण्यात आले होते. या दरपत्रकाला अंतीम मंजुरी मिळण्यासाठी त्याची फाईल आरटीओकडे पाठवण्यात आली आहे. आरटीओच्या मंजुरीनंतर बस सेवेचे तिकीट शुल्क निश्चित होईल.

५० बसेसपोटी एक कोटी ६० लाख रुपये

महापालिका पहिल्या टप्प्यात ५० डिझेल बस सुरू करणार आहे. या ठेक्यात प्रवासी मिळो ना मिळो ठेकेदाराला दिवसाला प्रति बसमागे किमान २०० किलोमीटरचे भाडे देणे बंधनकारक असून महिन्याकाठी ५० बसेसपोटी एक कोटी ६० लाख रुपये द्यावे लागणार आहे.

पालिका बस तिकीट दराचा चेंडू आरटीओच्या कोर्टात
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -