Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीचे शुद्धीकरण

नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीचे शुद्धीकरण

नाशिककरांचे जीवन प्रवाहित करणार्‍या गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ’नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे.

Related Story

- Advertisement -

नाशिककरांचे जीवन प्रवाहित करणार्‍या गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी ’नमामि गंगे’च्या धर्तीवर गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत गोदावरीच्या पात्रात मिसळणार्‍या ६७ नाल्यांवर ओझोनायझेशन प्लांट बसविले जाणार आहेत. याद्वारे नदीपात्रात मिसळणार्‍या पाण्यातील प्रदूषणकारी घटकांची तीव्रता कमी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तपोवन मलजल शुद्धीकरण केंद्राजवळ प्रायोगिक तत्त्वावर एक प्लांट सुरू केला जाणार आहे.
गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. गोदावरीच्या प्रदूषणाचा प्रश्न थेट उच्च न्यायालयात पोहोचला असून, न्यायालयाने प्रदूषण कमी करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. मात्र, तरीही गोदावरीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे. सुमारे १९ किलोमीटरच्या पात्रात ६७ छोटे-मोठे नाले येऊन मिळतात. या नाल्यांमुळे प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे ते कमी करण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून स्मार्ट सिटी अभियानातून प्रोजेक्ट गोदा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यात गोदावरीचे पात्र खोलीकरण करण्यासह गोदावरीच्या सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे. गोदावरीतील नैसर्गिक नालेही मोकळे केले जात आहेत. गोदावरीत मिसळणार्‍या नाल्यांमधून येणार्‍या पाण्याचेही शुद्धीकरण आता केले जाणार आहे. गंगापूर गाव ते दसक-पंचक या पालिका हद्दीतील गोदापात्रात ६७ नाले विविध ठिकाणावरून प्रदूषित पाणी सोडत असल्याने त्याचाच बंदोबस्त नमामि गंगे या मोहिमेत केला जाणार आहे. त्यासाठी नागपूरमधील एका संस्थेच्या मदतीने ओझोनायझेशन प्लांट कार्यान्वित केले जातील. प्रथम प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेकडून एक रुपयाही न घेता नागपूरमधील एक कंपनी तपोवन मलजल शुद्धीकरण केंद्र अर्थातच एसटीपीवर ओझोनायझेशन प्लांट बसवले जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली आहे.

प्रकल्पात नक्की काय?

नागपूरच्या कंपनीने तयार केलेला ओझोनायझेशन प्लांट हा नाल्यांच्या मुखाशी बसवला जाणार आहे. एसटीपीतून पाणी शुद्ध केल्यानंतर पुन्हा ओझोनायझेशेन प्रकल्पातून प्रदूषणकारी घटक विलगीकरण केले जातील. हे पाणी ओझोनायझेशन प्लांटमधून प्रदूषणकारी घटक कमी करून नदीपात्रात सोडले जातील. प्लांटमध्ये पाणी आल्यावर त्यातील बीओडी अर्थात बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि टीसीएस अर्थात टोटल सस्पेंडेड सॉलिडची तीव्रता कमी केली जाईल. या दोन स्तरांवर प्रदूषण करणारे घटक कमी झाल्यास पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होईल.

- Advertisement -