Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक "माझ्या वरळी मतदारसंघात शिंदे-फडणवीसांना सभा घ्यावी लागते, हाच माझा विजय आहे" -...

“माझ्या वरळी मतदारसंघात शिंदे-फडणवीसांना सभा घ्यावी लागते, हाच माझा विजय आहे” – आदित्य ठाकरे

Subscribe

जेव्हा वरळी मतदारसंघात निवडणूका लागतील तेव्हा मी शिंदे-फडणवीसांना गल्लोगल्ली फिरायला लावणार आहे, आणि विजय आमचाच होणार आहे." असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

माझ्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना जोडीने सभा घ्यावी लागते, इथेच माझा विजय आहे. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा सचिन तेंडूलकर जेव्हा बॅटिंगसाठी उतरत असत तेव्हा त्यांच्यासमोर चार पाच जण फिल्डींग लावून उभे असतात. तसंच आज माझ्या वरळी मतदारसंघात शिंदे-फडणवीस हे फिल्डींग लावत आहेत. पण तरीही ही षटकार मारणारंच. जेव्हा वरळी मतदारसंघात निवडणूका लागतील तेव्हा मी शिंदे-फडणवीसांना गल्लोगल्ली फिरायला लावणार आहे, आणि विजय आमचाच होणार आहे.” असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू झालेला आहे. चार दिवसांची ही शिव संवाद यात्रा नाशिक, औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांमधून जाणार आहे. सध्या ते नाशिकमध्ये निफाड दौऱ्यावर आहेत. निफाड इथे शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य़ केलंय. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या ज्या ज्या सभा होतात तिथे लोक आपुलकीने येतात, कोणतेही खोके घेऊन येत नाही. माझ्याविरोधात लढण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हिंमतच नाही, वरळीतून लढणं जमत नव्हतं तर मला फोन करून सांगायचं…मी चॅलेंज बदलतो. मी ठाण्यातून लढण्यास तयार आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नवं चॅलेंज दिलंय.

- Advertisement -

शिवसंवाद यात्रेनिमित्त आनंदऋषी शाळेजवळील मैदानात आयोजित जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढलेत. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी टॉप ३ मधल्या यादीत त्यांचं नाव आलं होतं. पण आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव साधं टॉप १० च्याही यादीत नाही. आमच्यासोबत गद्दारी झालेली आहे. आणि ती कोणालाच पटली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही पाठीत वार केला नाही. हे ४० गद्दार सांगू शकता का? सुरत, गुवाहटी, गोवा मार्गे आलेले सांगू शकतील का? ५० खोके एकमद ओके असे लोक त्यांना बोलतात. ही घोषणा सगळीकडे दिली जात आहे. विधानभवनात ते सुद्धा ओके म्हणतात. राज्यकर्त्यांनी स्वतःला विकून टाकले, का गेले, कोणासाठी गेले. असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -