Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी नाशिक तिसर्‍या टप्प्यात : हॉटेल्स, सलून, पार्लर्सला दिलासा

नाशिक तिसर्‍या टप्प्यात : हॉटेल्स, सलून, पार्लर्सला दिलासा

पालकमंत्री छगन भुजबळांनी घेतला आढावा, रविवारी निघणार अधिसूचना, वाचा नाशिकमध्ये काय राहिल सुरू

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 7 जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे नाशिक पहिल्या नव्हे तर तिसर्‍या टप्प्यात येत असल्याने त्यानूसार जिल्हयात निर्बंध लागू राहणार आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत यावर विचार विनिमय करण्यात येऊन फेरबदल करण्यात येतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी अनलॉकबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर 4 जूनला मध्यरात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. जिथे 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्के ऑक्सिजन बेड आहेत, तिथे लॉकडाऊन राहणार नाही. नाशिकचा विचार करता नाशिकचे तीन टप्पे आहेत यात नाशिक महापालिका क्षेत्र, मालेगाव महापालिका क्षेत्र, ग्रामीण भाग त्यामुळे या प्रत्येक भागाची कोरोना सद्यस्थिती आणि आकडेवारी बघून निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात रूग्णसंख्या कमी असली तरी ग्रामीण भागात मात्र रूग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकूणच परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. अनलॉकची प्रक्रिया राबवतांना पाच टप्पे करण्यात आले असले तरी स्थानिक परिस्थिती पाहता यात फेरबदल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

जिल्हयाचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के

- Advertisement -

या पाच टप्प्यांचा विचार करता शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानूसार नाशिकच्या एकूण कोरोना परिस्थितीवर नजर टाकली असता जिल्हयाचा पॉझिटिव्हिटी रेट ७.७५ टक्के तर १७.७१ टक्के ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत. ऑक्सिजन बेडचे निकष जरी शासन निर्देशाप्रमाणे असले तरी, पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या टप्प्यांमध्ये नाशिक तिसर्‍या टप्प्यात येत असल्याचे स्पष्ट होते. अर्थात ही आकडेवारी ३ जून पर्यंतची आहे त्यामुळे यात अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या अधिसूचनेमध्ये जिल्हा व महानगरपालिका असे घटक करून त्यांच्यासाठी पाच लेवल्स निश्चित करण्यात आलेल्या आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व एकूण वापरात असलेले ऑक्सिजन बेड्स याचे प्रमाण विचारात घेऊन आपण कोणत्या लेवलमध्ये बसतो ते निश्चित करायचे आहे. त्यानंतर त्या लेवल साठी निश्चित केलेले नियम लागू होतील. त्यामध्ये सुद्धा स्थानिक परिस्थिती पाहून अंशतः फेरबदल करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आहेत. महापालिका व जिल्हा अशी पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड वापरा बाबतची स्वतंत्र माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही असले तरी हे सर्व नियम सोमवारपासूनच लागू होणार असल्याने सध्यातरी पूर्वीच्याच नियमाप्रमाणे वीकेंड लॉक डाऊन सुरू राहील.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

तिसर्‍या टप्प्यात काय सुरु राहील?

 • सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ या वेळेत खुली राहतील
 • मॉल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
 • हॉटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल
 • मॉर्निंक वॉक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
 • ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
 • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू (सोमवार ते शुक्रवार)
 • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
 • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्यंत खुले असणार (सोमवार ते शुक्रवार)
 • लग्नसोहळ् ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
 • कृषी सर्व कामे मुभा
 • जमावबंदी , संचारबंदी कायम राहील
- Advertisement -