घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन

नाशिक पोलीस आयुक्तालयात शस्त्रपूजन

Subscribe

विजयादशमीनिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील शस्त्रास्त्रांचे पूजन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. शस्त्र पूजनात एके 47, रायफल, पिस्टल, काडतुसे, एअर गन, जिलेटीन यांसह पोलीस दलातील इतर शस्त्रांचा समावेश होता. यावेळी पोलीस आयुक्तांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना विजयादशमीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार विभागात यंदाही शस्त्रांस्त्रांचे विधीवत पूजन करण्यात आले. शस्त्रांना झेंडूची फुले वाहून बॅण्ड पथकाच्या धूनवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी आरती केली. यावेळी पुरोहितांनी मंत्रोच्चार करत शंखध्वनी केला. यावेळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे यांच्यासह शस्त्रागार विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

- Advertisement -

 

नाशिक तालुका पोलीस ठाणे

नाशिक तालुका पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीका अहिरराव यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी पोलीस हवालदार वाघ, पोलीस नाईक पटेल, पोलीस शिपाई जगदीश जाधव उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -