Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र नाशिक-शिर्डी महामार्गावर उभी होती नादुरुस्त शिवशाही; चालकाने कमरेच्या करदोऱ्याने बसमध्येच घेतली फाशी

नाशिक-शिर्डी महामार्गावर उभी होती नादुरुस्त शिवशाही; चालकाने कमरेच्या करदोऱ्याने बसमध्येच घेतली फाशी

Subscribe

नाशिक : नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांगरी गावाजवळ नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही मध्ये बसच्या चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कंबरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने बसच्या छताला लटकून फाशी घेतल्याची बाब समोर आली आहे. राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) असे मयत चालकाचे नाव आहे.

एसटी बस चालक राजू हिरामण ठुबे नाशिक तालुक्यातील दोनवडे गावातील रहिवासी आहेत. राजू ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्ती जवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक निघून गेले.

- Advertisement -

दरम्यान, बस दुरुस्त करण्यासाठी रात्री १ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदेवस्ती जवळ आले. यावेळी बस चालक राजू ठुबे याने बसमध्ये पाठीमागच्या सीटवर हँडलला करदोऱ्याच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. वाहन दुरुस्ती पथकाने तात्काळ या घटनेची माहिती वावी पोलिसांना दिली. वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. राजू ठुबे यांनी आत्महत्या का केली याचे काय कारण अद्याप समजू शकले नाही. गुरुवारी (दि.२५) पहाटे ६ वाजेच्या सुमारास सिन्नरचे आगार प्रमुख नेरकर यांच्यासह नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -