नाशिक : कसमादे परिसरासह जिल्ह्यातील पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून अशीच परिस्थिती आगामी काळात राहील्यास संपूर्ण भाग दुष्काळी जाहीर करण्यात यईल, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी सटाणा येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळ्यात बोलतांना जाहीर केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पक्षनिरीक्षक हेमंत पवार, जिल्हा संपर्कप्रमुख सुनील पाटील, जिल्हाप्रमुख संजय दुसाणे, महिला आघाडी प्रमुख संगिता चव्हाण, उपजिल्हाप्रमुख प्रविण भामरे उपस्थित होते.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून आगामी दोन महिन्यांत अशीच परिस्थिती राहील्यास तिव्र पाणीटंचाई व पशूधनासाठी चार्याची टंचाई निर्माण होईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने आतापासून पाणी बचतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले. शासनाने एक रुपयात शेती पिकासाठी विम्याची व्यवस्था केली असून प्रत्येक शेतकर्याने आपल्या मोबाईलवरून शेत पिकाची ऑनलाईन नोंद करून विमा काढून घेण्याची विनंती केली. महायुती शासनाने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी गावागावात जावून या योजनांची माहिती जनतेला करून द्यावी. आगामी काळात महिलांसाठी महायुती सरकार अनेक नवीन योजना राबविणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी महिला बचतगटांची स्थापना करून पुढील काळात येणार्या योजनांचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी परिश्रम घेण्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पक्षनिरीक्षक हेमंत पवार, प्रविण भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात बोलतांना तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी कसमादे परिसर दुष्काळी जाहीर करून नाफेडने कांद्याला ३ हजार रुपये क्विंटल दराने भाव द्यावा, अशी मागणी पालकमंत्री भुसे यांच्याकडे केली. पालकमंत्री भुसे यांचे सटाणा शहरात शिवतिर्थावर आगमन होताच फटाके फोडून ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पायीच मेळाव्या स्थळी पोहोचले.
यावेळी सटाणा शहरासह तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करून नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. तालुकाप्रमुखपदी सुभाष नंदन, सटाणा शहरप्रमुख सुनील पाटील, शहर संघटक विशाल आंबेकर, शहर सचिव सूरज परदेशी, सरचिटणीस नितीन सोनवणे, समन्वयक निलेश कर्डीवाल, उपशहरप्रमुख बबन सोनवणे, करण अहिरे, केदा ह्याळीज, अंकुश जगताप, शिवाजी पगार, सुरजसिंग राजपूत, विभागप्रमुख म्हणून प्रितम दीक्षित, दीपक चिंचोले, युवराज बागुल, वैभव सोनवणे, अर्जुन सोनवणे, उदय सोनवणे, मनोज सूर्यवंशी, चेतन बगडाने, युवासेना उपशहर प्रमुखपदी चेतन सोनवणे, प्रसाद बच्छाव, दिनेश सोनवणे, आकाश तिवारी कामगार सेना तालुका प्रमुख निलेश कर्डिवाल, तालुका सचिव ज्ञानेश्वर बेलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी देविदास भामरे, नितीन घरटे, मधुकर महाजन, कैलास नंदन, अशोक नंदन, मनोहर निकम,किरण पवार ,शरद पवार, मच्छिंद्र माळी, वैशाली चव्हाण, रत्नाताई भामरे, नाना जगताप, रवींद्र सोनवणे आदींसह कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.