घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये टोमॅटोचे दर घसरले; शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर दिले फेकून

नाशिकमध्ये टोमॅटोचे दर घसरले; शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर दिले फेकून

Subscribe

टोमॅटोच दर घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. उत्पादनासाठी लागलेला खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला.

नाशिकमध्ये टोमॅटोचा दर घसरल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिकमध्ये एक किलो टोमॅटो २ रुपयाने विकला जात आहे. टोमॅटोचा दर मातीमोल झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. टोमॅटोच्या उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यावरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.

- Advertisement -

टोमॅटो २ रुपये किलो

श्रावण महिन्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दर देखील वाढतात. श्रावणात भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाज्यांदे दर घसरले आहेत. त्यामध्ये टोमॅटोचे दरात मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे. नाशिकमध्ये टोमॅटोचा दर प्रतिकिलो दोन रुपये झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरश: रस्त्यावर टोमॅटो फेकून दिला आहे.

शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर दिले फेकून

टोमॅटोचा दर्जा चांगला असला तरी टोमॅटोला दर चांगला मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक आणि मनमाड मधील शेतकऱ्यांनी टोमॅटोची तोडणी करुन गुरांना खाऊ घातला तर काही शेतकऱ्यांनी तो फेकून दिला. एका शेतकऱ्यांनी एका एकर टोमॅटोसाठी ८० हजार रुपये खर्च केले. मात्र आता टोमॅटोच्या उत्पादनासाठी, काढणीसाठी लागणारी मजूरी आणि वाहतूकिचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकण्याची वेळ आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -