घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक राष्ट्रवादी सत्तारांना पाठवणार ५० खोके सँडल : शहराध्यक्ष ठाकरे

नाशिक राष्ट्रवादी सत्तारांना पाठवणार ५० खोके सँडल : शहराध्यक्ष ठाकरे

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरून गलिच्छ भाषेत टीका करणार्‍या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी सत्तारांना ५० खोके सँडल पाठविण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले. यावेळी ५० खोके एकदम ओके, इडी सरकार च करायचं काय खाली डोक वरती पाय, बेगानी शादी मे अब्दुला दिवाना यासारख्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. पोलीस कर्मचार्‍यांनी पुतळा ताब्यात घेतल्यावर सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है या घोषणा आंदोलकांनी दिल्या. आंदोलनात जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, नाना महाले, अर्जुन टिळे, अनिता भामरे, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, बालम पटेल, धनंजय निकाळे, सलीम शेख, महेश भामरे आदि पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेविरोधात केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटावर सातत्याने ५० खोके घेतल्याचा आरोप केला जात आहे. यावरून सुळेंनीही टीका केली होती.

अब्दुल सत्तार यांनी मर्यादा सोडून टीका करणे व माफी मागणे हे त्यांच्या पदाला शोभत नाही. न्यायालयात गुन्हा गुन्हाच असतो त्यावर माफी मागून शिक्षा कमी होत नसते. त्यामुळे सत्तार यांना चपलांचे ५० खोके पाठविणार आहोत. : रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -