घरमहाराष्ट्रनाशिकउद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेला धक्का; नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी शिवसेनेला धक्का; नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरेंना धक्का मानला जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत महिला आघाडीने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मालेगावमध्ये सभा आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश हा उद्धव ठाकरेंना धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यावेळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) उपस्थित होते. नाशिकमध्ये ठाण्याप्रमाणे संघटना बांधण्याचे काम केले जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासोबतच नाशिकच्या विकासासाठी ठाण्याप्रमाणेच पॅकेज देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी नाशिक शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे, त्यामुळे हे आपलं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून मी कायम तुमच्यासोबत राहाणार असेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंची आजची मालेगावमधील सभा का आहे महत्वाची? वाचा..

- Advertisement -

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा मगर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, माजी नगरसेविका अॅड. श्यामला दीक्षित, माजी नगरसेवक उत्तम दोंदे, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, महिला आघाडी शहर समन्वयक ज्योती देवरे, माजी शिक्षण मंडळ सभापती व उप महानगर प्रमुख शशिकांत कोठुळे, उप महानगर प्रमुख शरद देवरे,उप विभाग प्रमुख कुमार पगारे, पिंटू शिंदे, विधानसभा संघटक पश्चिम अनिता पाटील, उप विभागप्रमुख आशा पाटील, शाखा प्रमुख सीमा पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश भार्गवे, नगरसेवक सुदाम डेमसे, सचिन भोसले, शिवा ताकाटे, योगेश बेलदार, आनंद फरताळे, रोशन शिंदे यांच्यासह महिला संघटक, १७ सरपंच, सभापती यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मालेगावमधील सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सभेला ३०० ते ५०० रुपये देऊन लोकांना आणले जाते. ते लोक शिंदेंच्याच सभेवेळी निघून जातात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी आज मालेगावमध्ये केली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी मौन बाळगले.

नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी खोटे आरोप करु नयेत. अन्यथा उत्तर सभा घेण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टोला लगावत म्हटले, की उत्तर सभा घ्या, की दक्षिण सभा घ्या. कोणत्याही दिशेला सभा घ्या, आता महाराष्ट्राची दिशा बदलणारी सभा होणार आहे.

हेही वाचा : मालेगावच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक शब्दही कमी पडेल, उर्दू भाषेतील पोस्टरवर संजय राऊत म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -