घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना मिळणार ताजा भाजीपाला; महापालिका सुरू करणार ‘फार्मर्स मार्केट’

नाशिककरांना मिळणार ताजा भाजीपाला; महापालिका सुरू करणार ‘फार्मर्स मार्केट’

Subscribe

थेट शेतातून येणारा ताजा, शुद्ध सेंद्रिय भाजीपाला तोही रास्त दरात नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेतला आहे.

थेट शेतातून येणारा ताजा, शुद्ध सेंद्रिय भाजीपाला तोही रास्त दरात नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. यासाठी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेतला आहे. शेतातील ताजा, सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला विक्री करणार्‍या निवडक शेतकरी गटांना सुटीच्या दिवशी नाशिक शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणार आहेत. अनेक वर्षांपासून यावर विचार सुरू असून त्यास मूर्त रूप आता येण्याची शक्यता आहे.

नाशिक शहरात अनधिकृत भाजीविक्रेत्यांमुळे रहदारीची समस्या उद्भवत आहे. विक्रेत्यांकडील भाजीपाल्याची गुणवत्ताही साधारणदर्जाची असतांना त्यासाठी बर्‍याचदा शहरी ग्राहकांना नाईलाजाने जास्तीचे दर मोजावे लागत आहे. यापार्श्वभूमीवर दर्जेदार, सेंद्रिय व विषमुक्त शेतमाल उत्पादन घेणारे शेतकरी गट व शहरातील ग्राहक यांची मोट बांधण्याचे महापालिकेने ठरवले आहे. गमे म्हणाले की, शेतमालाच्या उत्पादकाला अत्यंत कमी दर मिळतो. मात्र ग्राहकाला चार ते पाच पट अधिक दराने भाजीपाला घ्यावा लागतो. थेट शेतातून घाऊक बाजारात आलेला भाजीपाला मध्यस्त विक्रेत्यांमार्फत नाशिककरांकडे पोहेाचवला जातो. या प्रवासात भाजीपाल्याची गुणवत्ताही खराब होऊन जाते. थेट शेतातील भाजीपाला कमीत कमी वेळात ग्राहकांकडे पोहोचता झाल्यास त्याचा थेट लाभ शेतकरी व ग्राहकांना मिळेल.

- Advertisement -

राज्य शासनाचा कृषी विभाग तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या मार्फत नाशिक शहरात मागील काही वर्षांपासून शेतकरी गटांचे थेट विक्रीचे प्रयोग सुरू आहेत. यातील काही गटांच्या विक्री केंद्रावर पुन्हा मध्यस्थांनीच ताबा मिळवला आहे. ताजा, स्वच्छ, शुद्ध सेंद्रिय उत्पादन घेणारे अनेक गट, शेतकरी कंपन्या शहरात थेट भाजीपाला विक्रीसाठी उत्सुक आहेत. महापालिकेकडून जागा मिळत नसल्याची या गटांची तक्रार आहे. मात्र, आता महापालिकेचे आयुक्त गमे यांनीच यासाठी पुढाकार घेतल्यामुळे या समस्येवर मार्ग निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेतकरी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध होईल

नाशिक हा शेतकर्‍यांचा जिल्हा आहे. आपल्याकडे भाजीपाला, फळभाज्या, द्राक्ष, पुष्प, धान्य उत्पादक शेतकरी आहेत. कांदा उत्पादनामध्येही आपण अग्रेसर आहोत. शेतकर्‍यांना कशी मदत करता येईल यासाठी महापालिकेकडून आपण प्रयत्न करीत आहोत. या दृष्टीने सहा विभागात सुटीच्या दिवशी मोकळ्या भूखंडामध्ये फार्मस मार्केट खुले करण्यात येतील. या माध्यमातून शेतकरी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध करून देता येईल. – राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -