घरमहाराष्ट्रनाशिकमालमत्ता विक्रीचे आव्हान; चार संस्थांकडे अडकले २.८३ कोटी

मालमत्ता विक्रीचे आव्हान; चार संस्थांकडे अडकले २.८३ कोटी

Subscribe

झारीतील शुक्राचार्य : स्थानिकांचा विरोध पत्करून मालमत्ता विक्रीचे बँकेपुढे मोठे आव्हान

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिजोरीवर फक्त बड्या माशांनीच हात मारलेला नाही, तर छोट्या संस्थांनीही त्यात कोणतीही कसूर सोडलेली नाही. जिल्ह्यातील चार सहकारी संस्थांकडे बँकेचे दोन कोटी ८३ लाख रुपये अडकले आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम कमी वाटत असली तरी प्रत्येकाकडून वसुली करण्यासाठी बँकेला वर्षानुवर्ष झगडावे लागले. स्थानिकांचा विरोध पत्करून या संस्थांची मालमत्ता विक्री करणे हे बँकेपुढील आता सर्वांत मोठे आव्हान आहे.

जिल्हा बँकेने आर्थिक सुगीच्या दिवसांमध्ये छोट्या-मोठ्या सहकारी संस्थांना सढळ हाताने मदत केली. त्यात वणी येथील शरदराव पवार पतसंस्थेला एक कोटी ४५ लाख ८१ हजार रुपये कर्ज दिले. संस्थेने अखेरपर्यंत कर्जफेड न केल्यामुळे येथील जागेचा ११ जून रोजी जाहीर लिलाव केला जाणार आहे. एखाद्या संस्थेला कर्ज देऊन ते वसूल होत नाही म्हणून जागेची विक्री करणे, ही बँकेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. स्थानिकांचा विरोध आणि बँकेचे धोरण यात राजकारण सुरू होते व बँकेला कर्जवसूल करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. संदीप सुधाकर सोनजे औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था (झोडगे) यांच्याकडे ५० लाख ७७ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १९ मार्च २०१८ रोजी १५ लाख रुपये वसुली झाल्याचे दिसते. नाशिकच्या गोदावरी औद्योगिक सहकारी संस्थेकडे २१ लाख २४ हजार रुपये रक्कम थकली आहे. ठेंगोडा (ता.सटाणा) येथील नाशिक जिल्हा सहकारी सूतगिरणीकडे ६५ लाख ३५ हजार रुपये कर्ज बाकी आहे. येथील स्थानिकांनी मालमत्तेच्या विक्रीस तीव्र विरोध केल्यामुळे बँकेची कोंडी झाल्याचे दिसून येते. सर्वसामान्य सभासदांच्या २३०० कोटींच्या ठेवी बँकेत अडकेल्या असताना त्यांना स्वत:चे पैसे मिळत नाहीत. दोन हजार रुपयांचा धनादेशही वटत नाही. त्या बँकेची ’पत’काय असेल याचा अंदाज येण्यासाठी हे पुरेसे उदाहरण म्हणावे लागेल. अशा परिस्थितीत बँकेला कर्जवसुली करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याला स्थानिकांनी विरोध केला, तर बँक वाचवणे अशक्य आहे.

- Advertisement -

प्रकरणाची सद्यस्थिती

वणी येथील शरदराव पवार पतसंस्थेविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपसेट प्रस्ताव दाखल केला. त्यावर अंतिम सुनावणी होऊन आता पतसंस्थेची जागा विकण्यासाठी ११ जून २०१९ रोजी जाहीर लिलाव होणार आहे. गोदावरी सहकारी पतसंस्थेच्या विरोधात दिवाणी न्यायालयात खटला सुरू असून बँकेने लिलावपूर्व नोटीस बजावली आहे. तसेच ठेंगोडा येथील सुतगिरणीच्या लिलावास स्थानिकांनी विरोध केल्यामुळे हे प्रकरण प्रलंबित आहे.

बोलके आकडे

1.45 : कोटी रुपयांचे कर्ज शरदराव पवार पतसंस्थेकडे थकीत
50.77 : लाख रुपये सोनजे औद्योगिक सहकारी संस्थेकडे
21.24 : लाख रुपये गोदावरी सहकारी पतसंस्थेकडे
65.35 : लाख रुपये ठेंगोडा सूतगिरणीची थकबाकी
11 जून 2019 : रोजी पवार पतसंस्थेचा लिलाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -