ग्रामसेवक जाधव यांची चौकशी

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील अंगणगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हिरामण जाधव यांनी शासकीय कामात गैरवर्तन व नियमबाह्य काम केल्यामुळे खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील अंगणगाव ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हिरामण जाधव यांनी शासकीय कामात गैरवर्तन व नियमबाह्य काम केल्यामुळे खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.

त्यांच्या कामाविषयी विविध प्रकारच्या गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणाबाबत कार्यवाही न करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीसाठी तसेच लेखापरीक्षणासाठी उपलबध करुन न देणे, नियमबाह्य खर्च करणे, अनधिकृत गैरहजर राहणे, कर आकारणी न करणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी होत्या. विविध कागदपत्रांवरुन यामध्ये सकृतदर्शनी तथ्य आढळल्याने शासकीय कामात गैरवर्तन तसेच नियमबाहय वर्तन केल्याने जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियमाद्वारे त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी करण्याच्या प्रस्तावास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मान्यता दिली आहे.