“बायका पोरांना सोडून दुसरी बरोबर का राहतो” अस विचारणाऱ्याचा केला खून

ओझर : तरुणीला घेऊ का राहतो, त्यामुळे तुझी बायको व मूल निघून गेल्याचे म्हणणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. राग अनावर झाल्याने संशयित आरोपीने धारदार कुकरीने तरुणावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. संशयित आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. परेश हरीश जाधव (वय २७, रा.मिलिंद नगर, ओझर) असे मृत तरुणाचे नाव आहे. दादा शामराव जाधव (वय ३७, रा.मिलिंद नगर, ओझर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.३०) रात्री १०.३० वाजता परेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ओझर येथील रिपाइंच्या वार्ताफलकाजवळ बसला होता. त्यावेळी दादा जाधव जात होता. तू तरुणीला घेऊन येथे का राहतो. त्यामुळे तुझी बायकोव मूल निघून गेले आहेत, असे परेश त्याला म्हणाला. राग अनावर झाल्याने दादा जाधव याने परेशला मारहाण केली. मी बाई ठेवीन नाहीतर काहीपण करेन, तुला काय करायचे, असे दादा जाधव म्हणाले. त्यानंतर दादा जाधव याने धारदार कुकरीने परेशवर वर्मी घाव केले. त्यात परेशचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पंकज हरीश जाधव यांनी रविवारी (दि.१) ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी दादा जाधव यास प्राथमिक आरोग्य केंद्र, ओझर येथील परिसरातून अटक केली.