Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक २५ लाख नाशिककरांनी घेतली लस

२५ लाख नाशिककरांनी घेतली लस

राज्य सरकारच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Story

- Advertisement -

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आणि लसीकरणाबाबतच्या प्रबोधनामुळे जिल्हयात लसीकरणाचा टक्का वाढू लागलाय. आतापर्यंत नाशिक जिल्हयात २५ लाख नागरिकांनी लस घेतली असून, यातल्या १८ लाख ३१ हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, तर ६ लाख ४३ हजार नागरिकांनी दुसरा डोस घेतलाय.

कोरोना संसर्गावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्यानं लसीकरणाला प्रतिसाद लाभतोय. सिन्नर तालुका हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. सिन्नर तालुक्यात सध्या २०४ रुग्ण उपचार घेत आहेत. बागलाणमध्ये २८, चांदवड ३८, देवळा १४, दिंडोरी १०, इगतपुरी १०, कळवण ८, मालेगाव २०, नांदगाव १४, निफाड ६६, पेठ १, सिन्नर १८०, सुरगाणा २, त्र्यंबकेश्वर ५, येवला ४८ अशा एकूण ४७३ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -