घरताज्या घडामोडीकरोना टेस्टींग लॅबसाठी केंद्रिय मंत्र्यांना साकडे

करोना टेस्टींग लॅबसाठी केंद्रिय मंत्र्यांना साकडे

Subscribe

खासदार डॉ. भारती पवार यांची आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे मागणी

नाशिक : जिल्ह्यात करोना विषाणुणाचा प्रार्दुभाव वाढतच चालला आहे. संशयीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी नाशिकमध्ये करोना टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रिय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना साकडे घातले आहे. करोनाच्या चाचण्या पुणे व धुळे येथील प्रयोगशाळेत होत आहेत. येथील नमूने येण्यासाठी किमान 48 तास किंवा त्यापेक्षा अधिक अवधी लागतो. त्यामुळे प्रशासनाला देखील कोण व्यक्ती संक्रमित आहे किंवा नाही यादृष्टीने कार्यवाही करण्यास अनेक अडचणी येत आहेत. याचे गांभीर्याने विचार करता नाशिकमधून निकष पूर्ण करणार्‍या अनेक लॅब धारकांनी पुढे येत आपला प्रस्ताव डी. जी. आयसीएमआर यांना पाठविले आहेत. खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी भ्रमणध्वनीहून चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत लवकरच नाशिकमधील प्राप्त प्रस्तावांची छाननी करून एक स्वतंत्र कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेस मान्यता देण्याचे आश्वासित केले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -