घरमहाराष्ट्रनाशिकपाऊस थांबल्यानं पूर ओसरला, गोदावरी नदीकाठच्या गावांना दिलासा

पाऊस थांबल्यानं पूर ओसरला, गोदावरी नदीकाठच्या गावांना दिलासा

Subscribe

सायंकाळनंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग कमी करण्यात आला.

संततधार पावसामुळे गोदावरीला महापूर येतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, काल दुपारनंतर पाऊस थांबल्यानं गोदावरीची पूर पातळी कमी झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरण क्षेत्रात संततधार सुरू असल्यानं गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला होता.

दुपारच्या सुमारास ८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलं होतं. नारोशंकर मंदिर अर्ध्यापर्यंत पाण्यात गेले होते. संततधार सुरू राहिल्यास महापूराची भीती व्यक्त होत होती.त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र, सायंकाळनंतर पावसाने पूर्ण उघडीप दिल्याने विसर्ग कमी करण्यात आला. आज रामकुंड परिसरातील पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -