घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये शहरात मृत्यूदर घटला

लॉकडाऊनमध्ये शहरात मृत्यूदर घटला

Subscribe

नाशिक : करोनाने जगभरात मृत्यूचे थैमान घातलेले असताना नाशिक शहरात मात्र लॉकडाऊनच्या काळात मृत्यूदरात घट झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मृत्यू अहवालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत विविध कारणांनी तब्बल तीन हजार 110 व्यक्तींनी प्राण गमविले होते. तर यंदा दोन हजार 717 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यावरुन लॉकडाऊनमध्ये शहरात विविध आजार, अपघातांमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.
शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात एका महिन्यात साधारणत: हजार व्यक्तींचा मृत्यू होतो. यामागे अपघात, दुर्धर आजार, आत्महत्या ही प्रमुख कारणे असतात. यंदा मार्च महिन्यात शहर लॉकडाऊन झाल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे. विशेषत: अपघाताने मृत्यू होणार्‍यांचे प्रमाणही कमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून दिसून येते. स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांचा मृत्यूदर जास्त आहे. गेल्या वर्षी (2019-20) फेब्रुवारी, मार्च व एप्रिल या तीन महिन्यात 1285 स्त्रीयांचा व 1905 पुरुषांचा मृत्यू झाला. चालू वर्षी 1181 स्त्रीयांचा तर 1526 पुरुषांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. नागरीकांना करोनाची भीती वाटत असली तरी त्यातुलनेत लॉकडाऊन हा नाशिकचा मृत्यूदर घटवण्यास उपयोगी ठरल्याचे स्पष्ट होते.

तुलनात्मक मृत्यू अहवाल
महिना–2019-20–20-21
फेब्रवारी-1187—-156
मार्च—198—–842
एप्रिल—1005—909
एकूण–3110—2717

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -