घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकचा टक्का घसरला; १२वीचा निकाल ८७.७७ टक्के

नाशिकचा टक्का घसरला; १२वीचा निकाल ८७.७७ टक्के

Subscribe

यंदा बारावी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८४.७७ टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा बारावी परीक्षेत नाशिक विभागाचा निकाल ८४.७७ टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाही सलग दुसर्‍या वर्षी नाशिक विभागाची निकालाची टक्केवारी घसरली आहे. यंदा निकालात १.३६ टक्के घसरण झाली. नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली.

नाशिक विभागाच्या निकालावर नजर टाकल्यास मुलींचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. यंदा विभागात १०१७ कनिष्ठ महाविद्यालयांतील १ लाख ५९ हजार ८९७ परीक्षार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १ लाख ३५ हजार ५५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये नियमित परीक्षार्थीमध्ये ८१.५२ टक्के मुले उत्तीर्ण झाली तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.१९ टक्के आहे. त्यात ६० हजार ५०० विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७.६७ टक्के अधिक आहे. विभागात सर्वाधिक निकाल जळगाव (८६.६१) तर सर्वात कमी निकाल धुळे (८३.५२) जिल्ह्याचा लागला. आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्याचा निकाल ८३.८२ टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात ५९ हजार ६२३, धुळे जिल्ह्यात २० हजार २०५, जळगावमध्ये ४२ हजार १०८, नंदूरबार १३ हजार ६१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी ८६.१३ टक्के निकाल होता. यंदा तो दिड टक्क्यांनी कमी झाला.

- Advertisement -

 १.३६ टक्क्यांनी घट

यंदा नाशिक विभागाच्या निकालात १.३६ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्याच्या निकालात एक टक्क्यांनी घसरण झाली आहे. बदललेला अभ्यासक्रम, कृती पत्रिका, आणि परिक्षेची काठीण्य पातळी यामुळे निकालाचा टक्का घटल्याचे दिसून येते. याकरता शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. – नितीन उपासनी, विभागीय सचिव, शिक्षण मंडळ

जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी

जिल्हा – निकाल (टक्के)

- Advertisement -

नाशिक –  ८४.१६
धुळे – ८३.५२
जळगाव – ८६.६१
नंदुरबार – ८३.८२
एकूण – ८४.७७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -