घरमहाराष्ट्रनाशिक१ लाख १३ हजारांवर गणेशमूर्ती, ११७ मे.टन निर्माल्य संकलित

१ लाख १३ हजारांवर गणेशमूर्ती, ११७ मे.टन निर्माल्य संकलित

Subscribe

पालिकेच्या उपक्रमांना नाशिककरांचा प्रतिसाद

दरवर्षी गणेश विसर्जनादरम्यान निर्माल्य आणि पीओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर गोदावरी प्रदूषण होत होते.मात्र, यंदा महापालिकेने ठिकठिकाणी उभारलेले कृत्रिम तलाव,मूर्ती संकलनासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार आणि निर्माल्य कलशांची व्यवस्था यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण रोखलं गेले.काल दिवसभरात या उपक्रमांमुळे शहरभरातून तब्बल १ लाख १३ हजारांहून अधिक गणेशमूर्ती आणि ११७ मेट्रीक टन निर्माल्य संकलन झाले.

महापालिकेसह सामाजिक संस्थांचा पुढाकार आणि त्याला लाभलेला नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळेच मोठ्या प्रमाणावर गोदावरी प्रदूषण टळलं. काल उशिरापर्यंत गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलन सुरू होतं. त्यासाठी महापालिकेच्या वतीनं ७६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -