घरमहाराष्ट्रनाशिकतिसर्‍या लाटेत सुमारे १ लाख मुलांना कोरोनाचा धोका

तिसर्‍या लाटेत सुमारे १ लाख मुलांना कोरोनाचा धोका

Subscribe

वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितलं जातंय. यासाठी जिल्हास्तरावर बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स गठीत करण्यात आलाय.

टास्क फोर्सने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे १ लाख १५ हजार बालकांना तिसर्‍या लाटेत कोरोनाचा धोका संभवतो. यातल्या ९५ टक्के बालकांना होम आयसोलेशनमध्येच उपचार करता येऊ शकतात. केवळ ५ हजार बालकांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. यादृष्टीनं प्रशासनाने पूर्वतयारी केली असून जिल्हयात सुमारे एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आलीये. तसंच, लहान मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी पालकांमध्येही जनजागृती करण्याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -