घरमहाराष्ट्रनाशिकद्राक्षपंढरीत सहा महिन्यात १० शेतकर्‍यांनी आवळला फास

द्राक्षपंढरीत सहा महिन्यात १० शेतकर्‍यांनी आवळला फास

Subscribe

द्राक्ष शेतीचे माहेरघर समजल्या जाणार्‍या व आर्थिकदृष्ट्या सधन तालुक्यात आसमानी व सुलतानी संकटाने बळीराच्याच्या गळ्याभोवती फास आवळला आहे.

सुनील घुमरे, दिंडोरी

धरणांचा तालुका व नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध दिंडोरी तालुक्यात चालू वर्षात जानेवारीपासून ते आतापर्यंत सहा महिन्यांत १० शेतकर्‍यांनी आत्महत्येचा फास आवळला असून, जूनमध्ये एकाच महिन्यात चार आत्महत्या घडल्या आहेत. यामुळे द्राक्ष शेतीचे माहेरघर समजल्या जाणार्‍या व आर्थिकदृष्ट्या सधन तालुक्यात आसमानी व सुलतानी संकटाने बळीराच्याच्या गळ्याभोवती फास आवळ्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

मागील हंगामात अत्यंत कमी पावसामुळे दिंडोरीत शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीत द्राक्ष व इतर शेती उभी केली. परंतु, निसर्गाच्या कृपेने व द्राक्ष भावातील घसरणीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला. यामुळे बँक कर्ज व शेती व्यवसायाशी संबंधित व्यापार्‍यांची देणेदारी मोठ्या प्रमाणात थकली. ही देणी चुकवण्यासाठी शेतकरी वर्गाला तारेवर कसरत करावी लागत होती. चालू हंगामात शेतीला अर्थपुरवठा करणार्‍या राष्ट्रीयकृत बँका व पतपेढ्यांनी कर्जाबाबत हात आखडते घेतल्याने शेतकर्‍यांपुढे मोठी आर्थिक संकट उभे राहिले. बी-बियाणे व कीटकनाशक विक्रेते, विविध कंपन्यांनी शेतकर्‍यांना उधारीत माल देणे बंद केल्याने संकट आणखीणच गहिरे झाले. ग्रामीण भागाची अर्थवाहिनी समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही बँक अडचणीत आल्याने शेतकरी वर्गाची जी थोडीफार रक्कम खात्यावर जमा आहे; ती मिळणे देखील मुश्कील झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत अजूनच भर पडली.

शेतमालाला चालू वर्षी अत्यंत कमी भाव मिळाल्याने उत्पन्नही जेमतेम मिळाले. तसेच तालुक्यातील काही द्राक्ष उत्पादकांचे पैसे परप्रांतीय व्यापार्‍यांनी बुडवल्याने शेतकर्‍यांपुढे संकटांची मालिकाच उभी राहिली. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सक्तीची वसुली चालू केल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला. शेतातील पिंकाना जवळपास नोव्हेंबर, डिसेंबरपासून बाजारभाव योग्य नसल्याने व जून संपत आला तरी पाऊस न पडल्याने शेतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ काही भागातील शेतकर्‍यांवर आली आहे.

- Advertisement -

वसूली थांबण्याची मागणी

दिंडोरी तालुक्यात शेतकरी आत्महत्या वाढत चालल्याने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची वसुली थांबवावी व बळीराजाला आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे

तालुक्यातील सहा महिन्यातील मयत शेतकर्‍यांची नावे

साहेबराव पुंडलिक वडजे (रा. मडकीजांब), प्रवीण धोंडीराम मेधने (रा. बंधारपाडा), गणेश विजय देशमुख (रा. मोहाडी) विजय जगन्नाथ कदम (रा. हातनोरे), गोरक्षनाथ उर्फ समाधान अशोक जाधव, प्रकाश निवृत्ती बस्ते (रा. शिंदवड), विलास शिवराज जोपळे (रा. चौसाळे), फकिरा घाणे (रा. बंधारपाडा), लक्ष्मण गणपत वाघ (रा. सारसाळे), रामनाथ पोपट जाधव (वसाळ, अवनखेड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -