घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसातपुर पिता-पुत्र आत्महत्या प्रकरणी १० जणांना पोलिस कोठडी

सातपुर पिता-पुत्र आत्महत्या प्रकरणी १० जणांना पोलिस कोठडी

Subscribe

नाशिक : कर्जबाजारीपणा व खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून फळविक्रेत्यासह त्याच्या दोन तरुण मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२९) दुपारी ३ वाजेदरम्यान घडली होती. सातपूरमधील राधाकृष्ण नगर परिसरात घडलेल्या या घटनेत एकाच घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तिघांनी गळफास घेतला. वडील दीपक शिरोडे (वय ५५), मुलगा प्रसाद दीपक शिरोडे (वय २५), राकेश दीपक शिरोडे (वय २३) यांनी आत्महत्या फाशी घेत आपला जीवन प्रवास संपवला होता. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीत वरुण पोलिसांनी काही खाजगी सावकारांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजार केले असता एकूण दहा जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळी घरात कन्येचा जन्म झाला आणि घरात चैतन्याच वातावरण असताना सातपुर भागात फळविक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणार्‍या वडील आणि दोघा तरुण मुलांनी एकाच वेळी घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शहर हादरले होते. मात्र, या घटनेमागे शहरात फोफावलेली खाजगी सावकारी असल्याचे समोर आल्याने संतापाचा देखील सुर उमटत होता. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत एकूण १० सावकारांना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस तपासात अधिक काय माहिती समोर येते. तसेच हे सावकार अजून कोणाला व्याजासाठी जाच करत आहेत हे देखील समोर येऊ शकते.

अटक केलेले आरोपी
  • भास्कर ओमकार सोनवणे (वय ५४) प्रथमेश अपार्टमेंट, संभाजी चौक, श्रमिक नगर
  • संजय सज्जन पाटील, धर्माजी कॉलनी, शिवाजी नगर
  • प्रकाश विठ्ठल गोऱ्हे (वय२६), कडेपठार, श्रमिक नगर
  • मुकेश भास्कर सोनवणे(वय ३०) प्रथमेश अपार्टमेंट, गंगा सागर, श्रमिक नगर
  • मुरलीधर रावण पाटील (वय ४८) टियर रेसिडेन्सी, खुंटवडनगर
  • किरण दामोदर बोडके, पिंपळ गाव बहुला
  • भरत वंजी पाटील(वय ४४) दुर्गाई सोसायटी, प्रगती शाळेत जवळ
  • गिरीश प्रकाशचंद्र खटोड(वय ४०) वृंदावण सोसायटी, औरंगाबाद नाका
  • शरद गोविंद पिंगळे(वय ४४) कृष्णा रो हाऊस, राधाकृष्ण नगर, सातपूर
  • शेखर सुरेश पवार (वय ३२) ओंमकार संकुल, शिवशक्ती चौक, शिवाजी नगर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -