घरताज्या घडामोडीजायखेड्यात 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह  

जायखेड्यात 10 नवे रुग्ण पॉझिटिव्ह  

Subscribe

जायखेडा कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मेहनत घेतली होती. परिणामी, जायखेडा तब्बल दोन महिन्यांच्यावर कोरोनामुक्त राहिला. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर जायखेड्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रविवारी (१४) पुन्हा सटाणा शहरात २ तर जायखेडा येथे १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जायखेडावासियांची चिंता वाढली आहे. जायखेड्यात ११ व तालुक्यात १४ रुग्ण आहेत. त्यापैकी १ सोमपूर, ३ जयपूर, ६ जायखेडा असे नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जायखेडा येथील ११ संशयितांपैकी १० व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये १ महिलाचा समावेश आहे. तर १० तरुणांचा समावेश आहे. यात सर्व २९ ते ३२ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे.  १० पॉझिटिव्ह रुग्ण मयत वाहनचालकाचे मित्र आहेेेत. कोरोनाबाधित रुग्णांवर मालेगाव व नाशिक येथे उपचार सुुरु आहेत. हनुमान चौक भागातील मयत वाहनचालक याच्या घरातील १ महिला तर १ पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर मयत वाहनचालचालकाचा २ वर्षांचा मुलगा निगेटिव्ह आला आहे. सटाणा शहराच्या तुलनेत जायखेडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. शासनाच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे.

- Advertisement -

आरोग्य पथकाद्वारे गावात तपासणी सुरु

आरोग्य विभाग, ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस यंत्रणा यांच्या मार्गदर्शनात पथकाद्वारे गावात आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबासह परिसरातील अनेकजणांची तपासणीही आरोग्य विभागाकडून होत आहे.

- Advertisement -

गावात फवारणी

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संपूर्ण गावात सॅनिटायझरची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी तसेच नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत अहिरराव व प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ. मोराळे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -