घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांसाठी १०० दिवसांचा महाद्राक्ष महोत्सव

नाशिककरांसाठी १०० दिवसांचा महाद्राक्ष महोत्सव

Subscribe

लक्षिका सभागृहात आयोजन

नाशिक : कृषी विभागाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल योजनेंतर्गत पोलीस प्रशासन, कृषी विभाग आणि ग्रीनफिल्ड अ‍ॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात महाद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते शनिवारी (दि.१८) या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले, अशी माहिती ग्रीनफिल्डचे अध्यक्ष अमोल गोर्‍हे यांनी दिली.

सिटीसेंटर मॉलसमोरील लक्षिका सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पोलीस कुटुंबियांचाही शेतकर्‍यांच्या कृषीमाल विक्रीसाठी हातभार लागावा, हादेखील या महोत्सवामागील हेतू आहे. अमोल गोर्‍हे यांनी द्राक्षनगरीतच उत्पादकांना चांगला भाव मिळवून देण्याहेतूने सलग १०० दिवसांच्या महाद्राक्ष महोत्सवाची संकल्पना मांडली. या महोत्सवाला पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीदेखील सहभाग घेतला असून, प्रत्येक विक्री केंद्रावर पोलीस कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

शहरात विविध ४५ ठिकाणी १०० दिवस शेतकर्‍यांची दर्जेदार द्राक्ष थेट नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. महोत्सवादरम्यान विविध दिवशी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शेफ विष्णु मनोहर हे महिलांना द्राक्षापासुन तयार होणारे खाद्यपदार्थ, द्राक्षांचे दागिने याबाबत माहिती देणार आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष उत्पादकांचा गौरव, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष विक्रेता पोलीस पाल्य, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी व द्राक्ष उत्पादकांचा गौरव करण्यात येणार असल्याचे गोर्‍हे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -