घरताज्या घडामोडीजिल्हा कृषी औद्योगिक संघातर्फे 11 लाख

जिल्हा कृषी औद्योगिक संघातर्फे 11 लाख

Subscribe

नाशिक : करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी नाशिक जिल्हा कृषि औद्योगिक सहकारी संघाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपयाचा डिमांड ड्राफ्ट चेअरमन अव्दय हिरे व सर्व संचालकांच्या वतीने देण्यात आला. जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांच्याकडे हा डीडी संचालक राजेंद्र डोखळे, संदीप गुळवे, भास्करराव बनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी गाडेकर यांनी सुपुर्द केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न पुरवठा मंत्री छगन भूजबळ व महाविकास आघाडीतील सर्वच मंत्रीगण रस्त्यावर उतरून काम करत आहे. सामाजिक संस्थांकडून गरजूंना आधार दिला जात आहे. गरिबांच्या जेवनाची व्यवस्था अनेकांकडून केली जात आहे. सरकार लढत असताना त्यांचे हात बळकट करण्यासाठी संघाकडून ही मदत केली जात असल्याचे राजेंद्र डोखळे यांनी यावेळी सांगितले. तसेच राज्य सरकार उत्कृष्ट काम करीत असल्याने या कामी त्यांना अधिक बळ मिळावे यासाठी त्यांचे अभिनंदन करणारे पत्र बलसाने यांचेकडे यावेळी देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -