घरताज्या घडामोडीचांदवड बाजार समितीतर्फे 11 लाखांची मदत

चांदवड बाजार समितीतर्फे 11 लाखांची मदत

Subscribe

नाशिक : राज्यातील करोनाचा विषाणू संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने 11 लाखांची मदत केली आहे. सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे व संचालकांतर्फे मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे सुपुर्द करण्यात आला. बाजार समितीमध्ये शनिवारी (दि.4) तातडीची सर्वसाधारण सभा पार पडली. सोशल  डिस्टंन्सिंगचे पालन करत संचालकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. करोनावर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी 11 लाख रुपये देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’या नावाचा धनादेश चांदवडचे तहसिलदार पाटील यांच्याकडे देण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सहाय्यक निबंधक पाटोळे, कृषि अधिकारी सांळुखे, बाजार समितीचे संचालक विलास ढोमसे, निवृत्ती घुले, अ‍ॅड. शिरिषकुमार कोतवाल, पंढरीनाथ खताळ, विक्रम मार्कंड, संपतराव वक्टे, आण्णासाहेब आहेर, संजय जाधव, प्रविण हेडा, सुरेश जाधव व शेतकरी प्रतिनिधी शांताराम ठाकरे, नितीन गुंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, सचिव जे. डी. आहेर व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -