घरताज्या घडामोडीCorona : ५ दिवसांत ११ हजार ८१८ नवे रुग्ण

Corona : ५ दिवसांत ११ हजार ८१८ नवे रुग्ण

Subscribe

नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, अवघ्या पाच दिवसांत 11 हजार 818 रुग्ण आढळले आहेत. रविवारी (दि.२१) सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यामध्ये २ हजार ३६० नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. सर्वाधिक १ हजार २८१ रुग्ण नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीण ८७८, मालेगाव १२८ आणि जिल्ह्याबाहेरील ७३ रुग्ण आहेत. दिवसभरात तब्बल १० रुग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहर ४, ग्रामीण भागातील ३, मालेगावचे २ आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे.

गतवर्षी अनेक सेवाभावी संस्थांनी मजुरांची व्यवस्था किंवा खाद्य पुरवठा केला होता. या वर्षी जीवनावश्यक वस्तूंची सर्व व्यवस्था सुरळीत ठेवली असल्यामुळे त्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, नागरिकांना स्वयंशिस्त लावण्याच्या दृष्टीने अनेक सेवाभावी संस्था काही ना काही प्रकारे मदत करू शकतात. या संदर्भामध्ये काही नाविन्यपूर्ण पावले उचलण्यासाठी सर्व संस्था, सजग नागरिकांना आवाहन आहे.

- Advertisement -

सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -