घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये विना हेल्मेटचे तब्बल ११२ बळी

नाशिकमध्ये विना हेल्मेटचे तब्बल ११२ बळी

Subscribe

सुरक्षेसाठी आवश्यक असणारे हेल्मेटकडे ९१ टक्के दुचाकीचालकांनी दुर्लक्ष, १३५ बळींपैकी हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीचालकांची संख्या तब्बल ११२

हेल्मेटविषयी पोलिसांकडून व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात असतानाही दुचाकी चालकांकडून त्यास प्रतिसाद मिळतच नसल्याचे पोलिसांचे सर्वेक्षण सांगते. या सर्वेक्षणानुसार सुरक्षेसाठी आवश्यक असणारे हेल्मेटकडे ९१ टक्के दुचाकीचालकांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधित वाहनचालकांसमोर हात टेकले आहेत. वर्षभरात झालेल्या अपघातांत १३५ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला. त्यात हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीचालकांची संख्या तब्बल ११२ असल्याची धक्कादायक माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

नाशिक शहरात दोन वर्षांपासून हेल्मेट सक्तीची अमलबजावणी सुरू आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक शाखेने २१ हजार ३४२ दुचाकीचालकांनी हेल्मेट परिधान न केलेल्या चालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ कोटी ६ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. असे असतानाही वाहनचालकांच्या डोक्यात प्रकाश पडताना दिसत नाही. हेल्मेट केवळ नियम पाळण्यासाठी नाही, तर आपल्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीदेखील आहे, ही बाब समजूनच घेतली जात नाही. त्यामुळे तब्बल ११२ चालकांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

हेल्मेट असूनही गमावला जीव

काही दुचाकीचालक केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हेल्मेट सोबत ठेवतात; परंतु ते डोक्यात न घालता दुचाकीच्या हॅण्डलला टांगून देतात. अशा अवस्थेत अपघात होऊन चालकाला आपला जीव गमवावा लागल्याच्याही अनेक घटना शहरात घडल्या आहेत.

सीट बेल्ट न लावल्यामुळे १३ जणांचा मृत्यू

वर्षभरात सरळ रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांनी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने वर्षभरात ५५५ अपघात झाले आहेत. त्यात २०२ जणांचा मृत्यू, ३८१ गंभीर जखमी, १५६ जखमी झाले आहेत. सीटबेल्ट न लावता चार चाकी वाहन चालवणार्‍या १३ चालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -