Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक शहरात घरफोड्यांमध्ये सव्वालाखाचा ऐवज लंपास

शहरात घरफोड्यांमध्ये सव्वालाखाचा ऐवज लंपास

बंद घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी केला घरात प्रवेश

Related Story

- Advertisement -

शहरात विविध भागात घडलेल्या घरफोडीसह चोरीच्या घटनांमध्ये सव्वालाख रुपयांच्या ऐवजासह मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.बाविस्कर कुटुंबिय बाहेरगावी गेले असता बंद घराच्या दरवाज्याचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेल्या चावीच्या सहाय्याने लॉकर उघडून त्यातील सोन्याचा नेकलेस, अंगठी, मंगळसूत्र, कर्णफुले आदी ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कमलाकर वाल्मिक बावीस्कर (रा. शिताई हौसिंग सोसायटी, जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सातपूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून हवालदार जी. वाय. पाटील तपास करत आहेत. नाशिकरोड, चिडे मळा या रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपूलाजवळ बजाज कंपनीच्या वतीने पथदीपाचे पोल लावण्याचे काम होणार आहे. त्यासाठी ठेवलेल्या साहित्यातून ४४ हजार रुपये किंमतीचे १२ पोल चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस हवालदार शिंदे तपास करत आहेत.

- Advertisement -