घरताज्या घडामोडीमालेगावात १३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगावात १३ नवे रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

दिंडोरीतील २, एसआरपीएफच्या २ जवानांचा समावेश, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६८४

मालेगावात करोनाचे थैमान सुरुच असून, सोमवारी (दि.११) दिवसभरात प्रशासनास तीन टप्प्यात १७५ रिपोर्ट प्राप्त झाले. त्यातील १५ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तर १२ जणांची दुसरी चाचणीही पॉझिटिव्ह आली. नव्या बाधितांमध्ये दिंडोरी व  मोहाडी येथील प्रत्येकी एक आणि मालेगावात बंदोबस्तासाठी तैनात एसआरपीएफचे अमरावती येथील दोन जवान व मालेगावातील ११ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता ६८४ वर पोहोचला आहे.

मालेगाव शहरात सर्वाधिक ५४७ करोनाबाधित असून, जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्येही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. सोमवारी प्रशासनास पहिल्या टप्प्यात 94 रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये चार पॉझिटिव्ह व ८७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एसआरपीएफचे ३५ व ३१ वर्षीय जवान आहेत. उर्वरित २३ व ५५ वर्षीय पुरुष मालेगावातील आहेत. तर, दुसर्‍या टप्प्यात ७९ रिपोर्ट प्राप्त झाले. यामध्ये ६० निगेटिव्ह, मालेगावातील ९ नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह व १० रुग्णांचे रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एक १६ वर्षीय मुलगा, ६७ वर्षीय महिला व ७६ वयोवृद्ध पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित चार महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

- Advertisement -

जिल्हाभरात करोनाचे २८ बळी

नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.१०) दिवसभरात आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्व मृत मालेगावातील रहिवाशी असून, मृत्यूपश्चात त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या २८ झाली आहे. यात नाशिक शहरातील एक गर्भवती महिला व एक पोलीस कर्मचार्‍याचा समावेश आहे. उर्वरित २७ व्यक्ती एकट्या मालेगावातील आहेत.

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण ——–६८६
मालेगाव शहरातील रुग्ण-५४७
नाशिक शहरातील रुग्ण -३९
अन्य —————–२१
नाशिक जिल्हा———८१
(नाशिक तालुका ८, चांदवड ४, सिन्नर ६, दिंडोरी ६, निफाड १०, येवला ३१, नांदगाव ३, सटाणा २, मालेगाव ग्रामीण ११)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -