घरताज्या घडामोडीमालेगावातील आरोग्यसेवेवर आता १४ अधिकार्‍यांचा ‘वॉच’

मालेगावातील आरोग्यसेवेवर आता १४ अधिकार्‍यांचा ‘वॉच’

Subscribe

चोवीस तास राहणार कार्यरत, प्रत्येक रूग्णालयासाठी दोन अधिकारी

करोनाचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर काम करीत आहे. आरोग्य प्रशासनामार्फत बाधित रुग्ण तसेच त्यांच्या क्वारंटाईन केलेल्या नातेवाईकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. आरोग्य प्रशासनातील प्रत्येक घटक हा त्याची जबाबदारी पार पाडत असतांना येणार्‍या प्रशासकीय बाबींच्या पूर्तता व अडचणींचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दोन याप्रमाणे १४ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे.

मालेगाव शहरात नागरिकांच्या मोठया प्रमाणात तपासणी करण्यात येत आहे. अनेकदा रूग्णांकडून आरोग्य सेवेबाबत तक्रारी प्राप्त होतात. याकरीता रुग्णालयातील कामकाज सुरळीत चालु आहे किंवा नाही, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित आहेत किंवा नाही, त्यांना येणार्‍या अडचणींसह प्रशासकीय बाबींच्या पूर्तता व रुग्णांच्या अहवालासह त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबरोबर रुग्णालयातील संपुर्ण कामकाजावर सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात सनियंत्रण अधिकारी नियुक्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने या अधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सोपविण्यात आलेल्या जबाबदारी मध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ तसेच भा.द.वि.१८६० मधील कलम १८८ आणि शासनाच्या प्रचलित अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

या रूग्णालयांचे संनियंत्रण
बडी मालेगाव, मन्सुरा हॉस्पीटल, जीवन हॉस्पीटल, फरानी हॉस्पीटल, आय.एच.एस.डी.पी., या.ना.जाधव हायस्कुल, जाट मंगल कार्यालय, चाळीसगाव फाटा, मालेगांव या सातही ठिकाणी दोन शिफ्टमध्ये या १४ अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून  या अधिकार्‍यांमार्फत चोवीस तास रुग्णालयातील कामकाजाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -