घरताज्या घडामोडीमालेगाव कोरोना हॉटस्पॉट : 4 बळी, नवीन 14 रुग्ण पॉझिटिव्ह

मालेगाव कोरोना हॉटस्पॉट : 4 बळी, नवीन 14 रुग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

मालेगावात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. तरीही, मालेगावात दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी (दि.17) जिल्हा रुग्णालयास मालेगावातील 14 रुग्णांचे रिपोर्ट मिळाले. ते सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आता मालेगावात 62 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोनाचे जिल्ह्यात 4 बळी गेले आहेत. सर्व मयत मालेगावातील आहेत.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण 70 झाले आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माळेगावातील 14 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील आहेत.  या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

14 पॉझिटिव्ह रुग्ण ठिकाण व वयोगटनिहाय ( कंसात)

चंदनपुरी गेट परिसर (45), गुरुवार वार्ड (75),  3 रुग्ण बेलबाग (17, 9, 42), खोली (26), सिद्धार्थवाडी (40), इस्लामाबाद (38), इस्लामपुरा (40), नायापुरा(62), इतर (71).

- Advertisement -

नाशिक कोरोना क्विक अपडेट

पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 70

मालेगाव 62
नाशिक शहर 5
( गोविंदनगर, नाशिक रोड, आंदवली, अंबड सातपुर लिंक रोड, समाज कल्याण निवारागृह)

नाशिक ग्रामीण 03
(चांदवड, सिन्नर, लासलगाव)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -