घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा पतआराखडा १४ हजार कोटीचा

जिल्हा पतआराखडा १४ हजार कोटीचा

Subscribe

जिल्ह्याचा चालू वर्षाचा १४ हजार कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा तयार करण्यात आला असून त्याच्या नियोजनाकरीता जिल्ह्यातील सर्व बँक अधिकार्‍यांची बैठक शनिवारी (दि.२९) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार ८७५ कोटींची वाढ झाली आहे. हा आराखडा बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक आणि अन्य बँकांच्या पुढाकारातून तयार करण्यात आला आहे. गतवर्षी ११ हजार १२५ कोटींचा पत आराखडयास मंजूरी देण्यात आली होती.

हे वाचा – शिक्षण समितीवर कमळ फुलले; धनुष्य भात्यात

यंदा कृषी क्षेत्रासाठी ७ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बिगर शेती क्षेत्रासाठी ४ हजार कोटी तर अन्य प्राथमिकता क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत बँकांना शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याचे आवाहन केले. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत बँकेत दाखल होणारी कर्ज प्रकरणांना मंजुरी द्यावी. तसेच स्टँड अप इंडीया, स्टार्ट अप इंडीया व ५० मिनिटांतं १ कोटी रूपयांचे कर्ज प्रकरणांबाबत जनजागृती करून ही प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. यासंदर्भात दर आठवडयाला बैठक घेउन आढावा घेण्याच्या सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

- Advertisement -

यावेळी अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, संजय बुरहाडे, विभागीय व्यवस्थापक बी.एस.तवरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भारत बर्वे उपस्थित होते.


 

पक्षी निरीक्षणाची सुवर्ण संधी; नांदुरमध्यमेश्वरमध्ये ४० हजार पक्षी दाखल!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -