घरमहाराष्ट्रनाशिक१५ लाखांची मिरची लांबवणारे गजाआड

१५ लाखांची मिरची लांबवणारे गजाआड

Subscribe

नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून दोघांना केली अटक

कर्नाटक येथील एका आले व्यापार्‍याला आणि कोल्हापूरच्या व्यापार्‍यांची १५ लाखांची मिरची लंपास करणार्‍या दोन भामट्यांना नाशिक शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी कार व २ लाख २० हजार रुपये जप्त केले. न्यायालयाने दोघांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मोसीन अकिल शेख (वय २९, रा. सातपूर), अब्रार मेहबुब बागवान (वय २७, रा.भद्रकाली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

२० फेब्रुवारी ते ५ मार्च २०२१ या कालावधीत संशयित आरोपींनी संगनमत करत कोल्हापूरचे व्यापारी संदिप पाटील यांची १५ लाख रुपयांची लाल मिरची खरेदी दुसर्‍या टेम्पोमध्ये परस्पर टाकून घेतली. मिर्चीचे पैसे लवकरच देतो, असे सांगून संशयितांनी पैसे न देता पैसे नसलेल्या बँक खात्याचा चेक दिला. त्यांनतर संशयित मोबाईल बंद करुन गायब झाले. याप्रकरणी पाटील यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. मोबाईल व ज्या गाड्यांमध्ये माल भरला होता. त्या ठिकाणी वाहनचालकांचा शोध पोलिसांनी घेण्यास सुरुवात केली. त्याआधारे पोलिसांना दोघांचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -