घरताज्या घडामोडीसाहित्य संमेलनाच्या जर्मन स्ट्रक्चरच्या सभामंडपाची तयारी वेगात

साहित्य संमेलनाच्या जर्मन स्ट्रक्चरच्या सभामंडपाची तयारी वेगात

Subscribe

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अलिशान संभामंडपसाठी १५० राजस्थानी कामगार सज्ज

नाशिक : शहरात होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राजस्थानातील १५० कामगार दिवसरात्र मुख्य सभामंडपाची उभारणी करत असून, मंडपाचे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, हा सभामंडप जर्मन स्ट्रक्चरचा आणि संपूर्ण वॉटरप्रुफ असेल. या सभामंडपात तब्बल ७ हजार रसिकांना बसता येणार आहे. कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॉलेज सिटी येथे ३ ते ५ डिसेंबरदरम्यान होणार्‍या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे.

संमेलनासाठी ६० मीटर रुंदीचे आणि २५० मीटर लांबीचे लाँग स्पॅन असलेले जर्मन स्ट्रक्चर वापरून सभामंडप उभारण्यात येत आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूस मोकळी जागा आणि इतर सोयी करण्यात आलेल्या आहेत. ८० फूट बाय ४० फूट असा भव्य मंच या ठिकाणी उभारण्यात येत आहे. स्टेजवर तीन वेगवेगळ्या लेव्हल्स असणार आहेत. तर दोन्ही बाजूस एलईडी वॉल असणार आहे. सभागृहात येण्यासाठी साधारण पाच प्रवेशद्वार देण्यात आले आहेत. सभागृहात एकूण वेगवेगळ्या ठिकाणी १२ एलईडी स्क्रीन असणार आहेत. त्यामुळे सभागृहात बसलेल्या रसिकांना पूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. शिवाय, संमेलनस्थळी एक २५० आसनक्षमता असलेला उपमंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती समितीप्रमुख रंजन ठाकरे आणि वास्तुविशारद दिनेश जातेगावकर यांनी दिली आहे.

साहित्य संमेलनाचा मुख्य सभामंडप ३० नोव्हेंबरपर्यंत तयार केला जाणार आहे. राजस्थानचे १५० कामगार दिवसरात्र सभामंडप तयार करत आहेत. सभामंडप साहित्यिक व रसिकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास आहे.– अमर वझरे, मंडप ठेकेदार

  • असा असेल सभामंडप
  • ६० मीटर रुंद
  • २५० मीटर लांब
  • ७ हजार आसनक्षमता
  • ५ प्रवेशद्वार
  • १२ स्क्रिन
  • ८० बाय ४५ साईजचा स्टेज
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -