घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये अपघातात १६ पोलीस जखमी; ४ गंभीर

नाशिकमध्ये अपघातात १६ पोलीस जखमी; ४ गंभीर

Subscribe

नाशिकमध्ये पोलिसांच्या गाडीला अपघात होऊन १६ जण जखमी झाले आहेत. तर, ४ जण गंभीर जखमी झाले अहेत.

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारात अपघात झाला. या अपघातामध्ये १६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. या गंभीर पोलिसांना नाशिक येथील खासगी अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कळवण येथे बंदोबस्तासाठी नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून पोलीस जात होते. यावेळी वाहन क्रमांक MH १५ AA ३०६७ मध्ये चालक आणि १५ कर्मचारी होते. या वाहनाला आठंबे शिवारात दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास गाडी पलटी होऊन अपघात झाला. ज्यामध्ये १६ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यापैकी चार पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर कळवण येथील सीए गालिब मिर्झा यांनी मोबाईलवरून अभोणा येथील पोलीस कर्मचारी बबनराव पाटोळे यांना तत्काळ माहिती दिली. श्री.पाटोळे यांनी हि माहिती तात्काळ कळवण पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांना दिली. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका आणि मिळेल त्या खाजगी वाहनांनी सर्व जखमींना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

चार गंभीर जखमी

अपघातग्रस्तांपैकी अमरसिंग छोटूसिंग हजारी वय वर्षे ५६, चंद्रकांत शंकर माळी वय वर्षे ५३, निंबाजी सोमा जगताप वय वर्षे ५६, काशिनाथ एकनाथ पवार वय वर्षे ४३, किशोर वामन भांगरे वय वर्षे ४० यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील अपोलो रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर दशरथ परशराम बोरसे वय वर्षे ४८, भास्कर माधवराव देशमुख वय वर्षे ४९, चैतन्य बालाजी सपकाळे वय वर्षे ५३, दत्तु बालाजी सानप वय वर्षे ५४, मनोहर पांडुरंग केदारे वय वर्षे ५४, बाळू काशिनाथ लोंढे वय वर्षे ५२, बाळासाहेब निवृत्ती शिंदे वय वर्षे ४०, राजू कचरू वाघ वय वर्षे ५३, रमेश सखाराम चौधरी वय वर्षे ५४, अनिल सजन कोकाटे वय वर्षे ५०, अनिकेत सुनिल मोरे वय वर्षे २६ या सर्व जखमींवर कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -