घरताज्या घडामोडी३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नजर; कंटेनरमधून १६ हजार १६४ दारुच्या बाटल्या जप्त

३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर नजर; कंटेनरमधून १६ हजार १६४ दारुच्या बाटल्या जप्त

Subscribe

नाताळसह नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी मद्यपींना थर्टी फर्स्टचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापासत्र सुरु केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली फाटा येथे शुक्रवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास दोन वाहनांमधून 13 लाख 53 हजार 400 रुपयांचा मद्यसाठा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच दिंडोरी पथकाने सोमवारी (दि.२१) पहाटे 4 वाजेदरम्यान सुरगाणा तालुक्यातील कुकडने येथे सापळा रचत दोनजणांना अटक केली. पथक आल्याची चाहूल लागताच एकजण फरार झाला. पथकाने दोघांच्या ताब्यातून कंटेनरसह १६ हजार १६४ सिलबंद बाटल्या असलेले ५७५ बॉक्सचा अवैध मद्यसाठा असा एकूण ५३ लाख ६८ हजार ३२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisement -

नवापूर (ता.नंदुरबार) येथील ट्रकचालक फैजान रफिक शेख (वय २६), कुकडने (ता.सुरगाणा) येथील त्रिकमराम मेजलाजी रेबारी (वय २६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कुकडणे येथील महेश भोये असे फरारी झालेल्याचे नाव आहे.

दादरा नगर हवेलीवरुन अवैधरित्या देशी व विदेशी मद्याची वाहतूक ट्रक (एनएल ०२ के ०९४५)मधून केली जात असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार दिंडोरी पथक क्रमांक तीनने सुरगाणा तालुक्यातील कुकडने येथे सापळा रचला. पथकाने ट्रक अडवून पाहणी केली. ट्रकमध्ये विदेशी रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या १ हजार ७४० सिलबंद बाटल्याचे १४५ बॉक्स, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ११५१ सिलबंद बाटल्याचे २४ बॉक्स, अँटीक्युटी ब्लू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ९८ बाटल्याचे ८ बॉक्स, मॅकनटोश व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ९६ सिलबंद बाटल्याचे ८ बॉक्स, ब्लेंडर प्राइड व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ९६ सिलबंद बाटल्याचे ८ बॉक्स, इंपिरीयल ब्लू व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ५७६ सिलबंद बाटल्याचे ४८ बॉक्स, १८० मिलीचे ८ हजार ४०० सिलबंद बाटल्याचे १७५ बॉक्स, मॅकडोवेल सेलिब्रेशन रमच्या ७५० मिलीच्या १६८ सिलबंद बाटल्याचे १४ बॉक्स, १८० मिलीच्या ७२० सिलबंद बाटल्याचे १५ बॉक्स, किंगफ्रिशर तीव्र बिअरचे ५० मिलीचे १ हजार ६८० सिलबंद बाटल्याचे ७० बॉक्स, हायवर्डस बिअरचे १ हजार ४४० सिलबंद टीनचे ६० बॉक्स आढळून आले. पथकाने दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून मद्यसाठा जप्त केला.

- Advertisement -

ही कारवाई दिंडोरी भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे, आर. एस. सोनवणे, दुय्यम निरीक्षक एस. एस. बागुल, एस. बी. शिंदे, जवान विष्णू सानप, व्ही. बी. पाटील, एम. पी. भोये, व्हि. ए. चव्हाण, एस. एम. भांगरे, साक्षी महाजन यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -