घरताज्या घडामोडीपिकअपसह देशी दारुचे १६२ बॉक्स जप्त; एक्साईची कारवाई

पिकअपसह देशी दारुचे १६२ बॉक्स जप्त; एक्साईची कारवाई

Subscribe

अवैधरित्या मद्य वाहतूक करणार्‍या दोनजणांना बुधवारी (दि.४) हतगड-अभोणा रोडवर, अभोणा फाटा, हतगड शिवार (ता.सुरगाणा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्यांच्या ताब्यातून देशी दारुचे १६२ बॉक्स व पिकअप जप्त केली. अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपास सुरु केला आहे.

अल्केश सुरेश इखंडे (२८, रा.घोडांबे, पो. बोरगाव, ता. सुरगाणा), अनिल चंदर महाले (२०, रा.गांधीनगर, सुरगाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

सुरगाणा तालुक्यातून अवैधरित्या मद्य वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी (दि.४) हतगड-अभोणा रोडवर, अभोणा फाटा, हतगड शिवार (ता.सुरगाणा) येथे वाहन तपासणी सापळा रचला. पथकाने एका पिकअप (एमएच ०६-बीजी २४५२) अडवत तपासणी केली असता पिकअपमध्ये देशी दारु टँगो पंच १८० मिली क्षमतेच्या १६२ बॉक्स असलेले ७७७६ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पथकाने दोघांना अटक करत त्यांच्या ताब्यातून १६२ बॉक्स व वाहन असा ११ लाख ४ हजार ३५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -