घरमहाराष्ट्रनाशिकमहाराष्ट्र गुजरात सीमेवर १८ लाखांची रोकड जप्त

महाराष्ट्र गुजरात सीमेवर १८ लाखांची रोकड जप्त

Subscribe

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंंदी नाका येथे आज सकाळच्या सुमारास सुरतहून नाशिकच्या दिशेने येणारया गाडीतून १८ लाख रूपये जप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंंदी नाका येथे शनिवारी, ६ एप्रिलला सकाळच्या सुमारास सुरतहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या गाडीतून १८ लाख रूपये जप्त करण्यात आले. इतक्या मोठया प्रमाणावर रोकड कोणत्या कारणासाठी आणली गेली याची चौकशी आयकर विभागामार्फत करण्यात येत आहे.

निवडणूक काळात आर्थिक व्यवहारांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. महाराष्ट्र गुजरात सीमेवरील चेकपोस्टवरून या मार्गे अवैध मद्य तस्करी, पैशांची वाहतुक होण्याची शक्यता लक्षात घेउन या भागात विशेष भरारी पथक नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास दिंडोरी मतदारसंघातील पेठ तालुक्यातील पिठुंदी नाका येथील महाराष्ट्र गुजरात सीमेवर एम.एच-१५, जीआर-४००७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची क्रेटा कारची तपासणी केली असता निफाड येथील रहिवासी  विनायक खरात, प्रदीप शेटे यांच्याकडून १८ लाख ९० हजार ९७० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. सध्या निवडणुका सुरू असल्याने ही रक्कम कोणत्या कारणासाठी आणली गेली याची चोैकशी आयकर विभागामार्फत सुरू करण्यात आली असून, तसा अहवाल सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप आहेर यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिला आहे. यापूर्वीही कळवण तालुक्यातील ओतुर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून २४ लाख रूपये इतर खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे समोर आले असून या संशयास्पद व्यवहाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -