घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक येथील १९ बालकांवर मुंबईत होणार हृदय शस्त्रक्रिया

नाशिक येथील १९ बालकांवर मुंबईत होणार हृदय शस्त्रक्रिया

Subscribe

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हृदय शस्त्रेक्रियेसाठी १९ बालके मुंबईस रवाना

 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरुवारी (दि.२) 31 बालकांपैकी 19 बालके ह्दयाच्या शस्त्रक्रियेसाठी पालकांसह जिल्हा रुग्णालय नाशिक येथून दोन बसने फोर्टीस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई रवाना झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य उपसंचालक डॉ. पुना गांडाळ यांनी हिरवा झेंडा दाखवून केले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.

महिला व बाल रुग्णालय, मालेगाव येथे २ डी इको शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात संशयित ह्दय रुग्ण असलेल्या ९० बालकांची २ डी इको तपासणी करण्यात आली. त्यात ३१ बालकांना हदय शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे आढळले. या ३१ बालकापैकी १९ बालकांना पुढील उपचारासाठी फोर्टीस हॉस्पिटल, मुलुंड, मुंबई येथे पाठविले आहे. उर्वरीत बालकांना टप्प्याटप्प्याने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी तथा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते. या उपक्रमासाठी मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हितेश महाले, जिल्हा सामान्य रुग्णालय नाशिकचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक दिपक चौधरी, फोर्टीस हॉस्पिटल मुलूंडच्या उत्तर महाराष्ट्राच्या मार्केटिंग मॅनेजर अर्चना मेतकर यांनी विशेष परिश्रम घेतले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -