घरमहाराष्ट्रनाशिकविनाइंजिन धावले पंचवटीचे १९ डबे; वेळीच नियोजनामुळे टळला अनर्थ

विनाइंजिन धावले पंचवटीचे १९ डबे; वेळीच नियोजनामुळे टळला अनर्थ

Subscribe

कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पंचवटी एक्सप्रेसच्या डब्बा क्रमांक तीन व चारमधील कप्लिंग तुटल्याने इंजिनबरोबर तीनच डब्बे इंजिन पुढे गेले आणि बाकी १९ अठरा डबे मागेच राहून गेले होते. इंजिन पुढे निघून गेल्यानंतरही हे डबे बरेच अंतर धावत राहिले. त्यांचा वेग मंदावल्यावर इंजिनच गायब असल्याचे पाहून प्रवाशांना धक्का बसला.

कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पंचवटी एक्सप्रेसच्या डब्बा क्रमांक तीन व चारमधील कप्लिंग तुटल्याने इंजिनबरोबर तीनच डब्बे इंजिन पुढे गेले आणि बाकी १९ अठरा डबे मागेच राहून गेले होते. इंजिन पुढे निघून गेल्यानंतरही हे डबे बरेच अंतर धावत राहिले. त्यांचा वेग मंदावल्यावर इंजिनच गायब असल्याचे पाहून प्रवाशांना धक्का बसला. या घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, शिवाय मध्य रेल्वेची वाहतूकदेखील काही काळ विस्कळीत झाली होती.

गुरुवारी सकाळी १०.४३ वाजता कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ही घटना घडली. त्यात पंचवटी एक्सप्रेसच्या डब्बा क्र्मांक ३ व ४ च्या यामधील कप्लिंग तुटल्याने इंजिनसोबत केवळ तीनच डबे पुढे गेले. तर, अन्य १९ डबे बराच वेळ विना इंजिनच धावत राहिले. त्यांचा वेग मंदावल्यावर काहीतरी बिघाड झाल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यांनी उतरून पाहिले तेव्हा डब्यांना इंजिनच नसल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. या मार्गावरुन धावणाऱ्या लोकलचा मार्ग त्वरित सुरळीत करण्यासाठी इंजिन व त्याबरोबरचे तीन डबे ठाण्याच्या दिशेने नेण्यात आले. तर, उर्वरित १९ डब्बे हे कल्याण जंक्शनकडे पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. या घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने अन्य गाड्यांचे त्यानुसार नियोजन केल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, ही घटना तांत्रिक चुकीने घटना असून, त्यात घाबरण्यासारखे काही नाही. मात्पर, घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -