Corona : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात १९ रुग्णांचा मृत्यू

Corona Crisis: Death toll from corona doubles official figures WHO Say
Corona Crisis:कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा अधिकृत आकडेवारीपेक्षा दुप्पट,WHOची धक्कादायक माहिती

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२) दिवसभरात १ हजार ४३० नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून, १९ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये नाशिक शहर ८, नाशिक ग्रामीण ८, मालेगाव २ आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६८ हजार ४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ८ हजार ९५९ रुग्ण उपचार घेत आहेत.

नाशिक शहरात ३ हजार ८८०, नाशिक ग्रामीण ४ हजार ५५७, मालेगाव ४०९ आणि जिल्ह्या बाहेरील ११३ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ४१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण ४७३, नाशिक शहर ७५०, मालेगाव १५७ आणि जिल्ह्याबाहेरील ३० रुग्णांचा समावेश आहे.