ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातून १९ गुन्हेगार तडीपार

बकरी ईदच्या कालावधीत नाशिक शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. पोलिसांनी १९ गुन्हेगारांना मंगळवार (दि.२०) रात्री ११ ते शनिवार (दि.२४) रात्री १२ वाजेपर्यंत तडीपार केले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दोन किंवा दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील १३ आणि मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील ६ असे एकूण १९ गुन्हेगारांना सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी मंगळवार (दि.२०) रात्री ११ ते शनिवार (दि.२४) रात्री १२ वाजेपर्यंत नाशिक शहरातून हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय व पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी केली आहे.