घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक परिमंडळाची १९१ कोटींची वीजबील थकबाकी

नाशिक परिमंडळाची १९१ कोटींची वीजबील थकबाकी

Subscribe

थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्काळ खंडीत करण्याचे आदेश

महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाची घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडील चालू थकबाकी ९४४ कोटींवर पोहचली असून वीजबिल थकवणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी दिले. नाशिक परिमंडळाची १९१ कोटींची थकबाकी असून यात नगर विभागाची थकबाकी ७३ कोटी आहे. वीज वितरणच्या थकबाकीचा आढावा घेण्यासाठी कोकण प्रादेशिक कार्यालया अंतर्गत येणार्‍या १२ जिल्ह्यात कार्यरत अधिकार्‍यांच्या कामाचा सह व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे थकबाकीचा आढावा घेतला. यावेळी ९० टक्के पेक्षा कमी वसुली करणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाईचा सोबतच या महिना अखेर सर्वात कमीवसुली करणार्‍या कार्यकारी अभियंता व तत्सम अधिकारी यांचे निलंबन करा असे आदेश त्यांनी दिले.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यातील घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे ही ९४४ कोटींची चालू थकबाकी असून यामुळे महावितरणच्या महसुलावर परिणाम होत आहे. वीज बिल थकीत ग्राहकांचा पुरवठा तत्काळ तोडा. कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी अनधिकृत वीज पुरवठा घेतला असल्यास अशा ग्राहकांविरुद्ध गुन्हा नोंद करा. वीज पुरवठा खंडित केल्यानंतर पुन:र्जोडणी शुल्क भरल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा सुरु करू नये. तसेच आगामी आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्टपूर्वी अत्यावश्यक कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास प्रादेशिक कार्यालयास अथवा ’प्रकाशगड’ या मुख्यालयास संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात गणेशमंडळांना विहित प्रक्रियेद्वारे तात्पुरती वीज जोडणी तत्काळ द्यावी. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत वीज जोडणी न घेणार्‍या मंडळांची यादी संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी.असे आदेश यावेळी विजयकुमार काळम पाटील यांनी दिले.

- Advertisement -

परिमंडळनिहाय पाच महिन्यातील चालू थकबाकी

नाशिक परिमंडळाची १९१. ७२ कोटी रुपये थकबाकी असून यामध्ये अहमदनगर मंडळाची ७३.४ कोटी, मालेगाव मंडळाची ३५.५६ कोटी नाशिक शहर मंडळाची ८२. ७६ कोटी यांचा समावेश आहे. जळगाव परिमंडळाची एकूणथकबाकी १३०.०४ कोटी असून यामध्ये धुळे मंडळाची ३०.७७ कोटी, जळगाव मंडळाची ८३.५३ कोटी व नंदुरबार मंडळाची १५.७४ कोटी थकीत आहेत. तरकोकण परिमंडळाची एकूण थकबाकी ४७.८३ कोटींची थकबाकी असून यामध्ये रत्नागिरी मंडळाची २८.२१ कोटी व सिंधुदुर्ग मंडळाची १९. ६२ कोटी यांचा समावेश आहे.

पुरग्रस्त भागाचा आराखडा तयार करा

महावितरण ग्राहकांना अखंड वीज पुरवठा करण्यास बांधील आहे. मात्र कोकण प्रादेशिक कार्यालया अंतर्गत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मोठ्यानद्या व नाले यांच्या किनार्‍यावरील वीज यंत्रणा वाहून गेली होती. यामुळे महावितरणचे अनेक ग्राहक प्रभावित झाले होते. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशाअडचणींचा सामना करण्यासाठी प्रत्येक परिमंडळ कार्यालयाने संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आवश्यकते प्रमाणे आराखडा तयार करून पाठवावा, असे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -