घर उत्तर महाराष्ट्र पालिकेत १९ वा जावई दाखल; वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. चव्हाण

पालिकेत १९ वा जावई दाखल; वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. चव्हाण

Subscribe

नाशिक : धोंड्याचा महिना संपला तरी महापालिकेत ‘जावयांचे’ लाड पुरवणे सुरूच आहे. किंबहुना, नवीन जावयांना स्थानापन्न करून घरातील (स्थानिक) लोकांचे राहण्याचे हाल केले जात आहेत. महापालिकेचे जावई ठरू पाहत असलेल्या १८ परसेवेतील अधिकार्‍यांमध्ये आता १९ व्या आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍याची भर पडली आहे. या पदावर संदर्भ सेवा रुग्णालयातील डॉ. तानाजी चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र सोमवारी (दि. ११) शासनाने महापालिकेस दिले.

महापालिकेतील तब्बल १८ परसेवेतील अधिकार्‍यांच्या हाती शहराचा कारभार देण्यात आला आहेे. या अधिकार्‍यांकडे शहरातील सवर्र्च महत्वाच्या खात्याच्या जबाबदार्‍या आहेत. यात शहर अभियंता, पाणीपुरवठा व तत्सम काही विभागांची जबाबदारी स्थानिक अधिकार्‍यांवर आहे. उर्वरित सर्वच कामे परसेवेतील अधिकार्‍यांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. सध्याचे ‘प्रशासन राज’ पाहता पावलोपावली त्याचा अनुभव येत आहे.

- Advertisement -

महापालिकेत आरोग्य वैद्यकीय अधिकारी ही जागा गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होती. या जागेवर स्थानिक अधिकारीही पात्र ठरत असताना त्यांचा दावा नाकारुन थेट संदर्भ सेवा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश शासनाचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी काढला.

काय आहे प्रकरण वाचा सविस्तर : “नशिक महापालिकेचे १८ जावई”; परसेवेतील अधिकाऱ्यांमुळे स्वायत्तता धोक्यात

आयुक्तांसमोर आज वाचला जाणार नाराजीचा पाढा

- Advertisement -

आयुक्तांनी गेल्या मंगळवारी (दि. ५) नवीन आदेश काढत सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (पाणीपुरवठा) विभागाचे पाणीपुरवठा, पाणीपट्टी निर्धारण आणि संकलनाचे काम कर उपायुक्तांकडे दिले आहे. पाणीपट्टी निर्धारण आणि संकलनाचे काम हे महसुलाशी संबंधित असल्याने ते कर विभागाला देणे संयुक्तिक आहे. परंतु, पाणीपुरवठ्याचीही जबाबदारी उपायुक्तांना देण्यात आल्याने त्यातून स्थानिक अधिकार्‍यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. केवळ शासन सेवेतील आहे म्हणून पदाने कनिष्ट असलेल्या अधिकार्‍याच्या अखत्यारित काम करावे लागत असल्याची खंत या अधिकार्‍यांनी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची मंगळवारी (दि. १२) दुपारी २ वाजता माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर, गजानन शेलार, गुरुमित बग्गा आणि दिनकर पाटील यांच्यासह काही अधिकारी भेट घेणार आहेत.

हेही वाचा : महानगरच्या ‘त्या’ बातमीचा दणका; महापालिकेच्या अनागोंदी विरोधात माजी नगरसेवक उचलणार मोठे पाऊल

- Advertisment -