मोहदरी घाटात स्विफ्ट कार अपघातात दोन ठार, दोन जखमी

2 killed and 2 injured in swift car accident at nashik mohdari ghat
मोहदरी घाटात स्विफ्ट कार अपघातात दोन ठार, दोन जखमी

सिन्नर मोहदरी घाटात अज्ञात वाहन व स्विफ्ट कारच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन जखमी झाले आहे, सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी (दि.१५) रात्री आठच्या सुमारास सिन्नर-नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात लोणी येथून पळसेकडे जाणारी स्विफ्ट कार (एम.एच.१३ एएफ ९४४१) व अज्ञात वाहनाचा अपघात झाला, स्विफ्ट कार मधील गणेश बालाजी एखंडे (३२) रा. पळसे, दशरथ राजाराम कासार (४२) रा. शेवगेदारणा हे दोघे जागीच ठार झाले, सुधाकर शिवाजी कासार (४५) हे गंभीर जखमी असून शशी अरुण गायधनी (३३) किरकोळ जखमी असल्याने त्यांना उपचारार्थ नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरिक्षक तुषार गरुड व पथकाने अपघात स्थळी धाव घेतली. सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.