घरउत्तर महाराष्ट्रनाशिकमध्ये एका दिवशी 2 बिबटे

नाशिकमध्ये एका दिवशी 2 बिबटे

Subscribe

सावतानगर पाठोपाठ गोविंदनगरातही बिबट्या

सिडकोतील सावता नगरात आज पहाटे (दि.१७) फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने ते भयभीत झाले. वन विभागाला यासंदर्भात माहिती देण्यात आल्यावर त्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बिबट्याचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सावतानगर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गोविंदनगर परिसरात दुसरा बिबट्या आढळून आला आहे. अशोका प्राईड इमारतीत डॉक्टर सुशील आहेर यांच्या घरात बिबट्या शिरल्याची माहिती आहे. वनविभाग आणि पोलीस विभागाकडून रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.

सावतानगर आणि शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालय परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावतानगरातील विठ्ठल मंदिर, जीएसटी कार्यालय, मिलिटरी हेडक्वार्टर, जलकुंभ, अभ्यासिका परिसरात बिबट्याचा संचार आढळला आहे. बिबट्याला वन विभागाने जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -