घरताज्या घडामोडीवडाळ्यात एकाच दिवशी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील दोघे करोनाबाधित

वडाळ्यात एकाच दिवशी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील दोघे करोनाबाधित

Subscribe

नाशिक शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी बाहेरगावी जाऊन आलेल्यांमुळे रुग्ण आढळण्याचे प्रकार सुरु आहे. मंगळवारी दाट लोकवस्तीच्या वडाळा गावठाणामधील कांदा व्यापारी करोनाबाधित आढळून आल्यानंतर आज त्याच्या संपर्कात आलेला हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २० वर्षीय तरुण व ४२ वर्षीय महिला बाधित असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला आहे. दरम्यान, आज दुपारी २.३० वाजता प्रशासनास आणखी मालेगावातील सातजण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

नाशिक शहरात ६ एप्रिल ते आत्तापर्यंत ५१ रुग्ण करोनाबाधित आहेत. त्यापैकी ३७ रुग्ण बरे झाले असून दोनजण मृत झाले आहेत. मंगळवारी (दि.१९) शहरात वडाळा येथे पॉझिटिव्ह आढळून आलेला रुग्ण कांदा व्यापारी असून पिंपळगाव येथून कांदा घेवून ते मुंबईत विक्री करत आहेत. रुग्ण बाधित असल्याचे समजताच आरोग्य विभागाने वडाळा परिसर सील करत संपर्क आलेल्या नातलग व नागरिकांना क्वारंटाइन करत त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील दोघांचा अहवाल आज प्रशासनास प्राप्त झाला असून हाय रिस्कमधील २० वर्षीय मुलगा व ४२ वर्षीय महिला बाधित आढळून आली आहे. मालेगावात सात नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल

पॉझिटिव्ह रुग्ण —-८67
नाशिक शहर —–५१
नाशिक ग्रामीण —-११२
मालेगाव शहर —–६७३
जिल्ह्याबाहेरील रुग्ण –३१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -